७४ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचांची निवड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:49 AM2021-02-17T04:49:21+5:302021-02-17T04:49:21+5:30
जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या दरम्यान संपुष्टात आल्याने १५ जानेवारी रोजी मतदान निवडणूक ...
जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या दरम्यान संपुष्टात आल्याने १५ जानेवारी रोजी मतदान निवडणूक झाली. यामध्ये रिसोड तालुक्यातील ३४, मालेगाव ३०, कारंजा २८, मंगरूळपीर २५, वाशिम २४ आणि मानोरा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सरपंच पदासाठी १५ ते १७ फेब्रुवारी अशा तीन टप्प्यांत निवडणूक होत आहे. १५ फेब्रुवारी रोजी ७५ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. १६ फेब्रुवारी रोजी ७४ ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये वाशिम तालुक्यातील १२, मंगरूळपीर १२, मालेगाव १०, रिसोड १७, कारंजा १४ व मानोरा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकीत बहुमत असणाऱ्या पॅनलचे उमेदवार विजयी झाले असून, प्रतिस्पर्धी उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथे सरपंच पदाच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी सहा मतांचा कौल मिळाल्यामुळे ईश्वरी चिठ्ठी काढण्यात आली. ईश्वरी चिठ्ठीत प्रमिला सीमाराम पवार यांची सरपंचपदी, तर रजनीश सुरेशचंद्र कर्नावट यांची उपसरपंचपदी वर्णी लागली.