स्वाभिमान, सबलीकरण योजनेला खीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:42 AM2021-04-01T04:42:55+5:302021-04-01T04:42:55+5:30
-------------- ९७ व्यावसायिकांची कोरोना चाचणी वाशिम : जिल्हाधिकाऱ्यांनी विविध प्रतिष्ठानधारक आणि व्यावसायिकांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. आरोग्य विभाग ...
--------------
९७ व्यावसायिकांची कोरोना चाचणी
वाशिम : जिल्हाधिकाऱ्यांनी विविध प्रतिष्ठानधारक आणि व्यावसायिकांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. आरोग्य विभाग याची अंमलबजावणी करीत असून, शुक्रवारी वाशिम शहरातील ९७ व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली.
-------------------
महामार्गावरील गतिरोधकांची दुरवस्था
वाशिम : जिल्ह्यात सुरू असलेले राष्ट्रीय महामार्गांचे काम अनेक ठिकाणी अंतिम टप्प्यात आले असून, मार्गांवर परावर्तक बसविण्यासह विविध मुख्य गावांतील चौकांत दुभाजक आणि गतिरोधकही तयार करण्यात आले आहेत. या मार्गावरील काही दुभाजकांची अल्पावधित दुरवस्था झाली आहे.
-------------------
बाधितांच्या संपर्कातील व्यक्तीची चाचणी
वाशिम : शहरासह तालुक्यातील १८० व्यक्तींना कोरोना संसर्ग असल्याचे निदान मंगळवारी झाले. आरोग्य विभागाने या सर्वांच्या हायरिस्क संपर्कातील व्यक्तींची तातडीने माहिती घेऊन त्यांची कोरोना चाचणी सुरू केली आहे.
-------------------