प्रकल्पबाधितांच्या वाढीव मोबदल्यासाठी आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:37 AM2021-03-15T04:37:30+5:302021-03-15T04:37:30+5:30
प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भेंडेकर, तसेच आसेगाव सर्कलमधील शेतकरी व प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी १५ मार्चला ...
प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भेंडेकर, तसेच आसेगाव सर्कलमधील शेतकरी व प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी १५ मार्चला वेगवेगळ्या प्रकल्पावर जाऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर १३ मार्च रोजीच आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये उपविभागीय जलसंधारण अधिकारी व पोलिसांनी बैठक घेत या प्रकरणी सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भेंडेकर व शेतकऱ्यांना दिली. यात आसेगावचे ठाणेदार स्वप्निल तायडे, भूसंपादन विभागाचे कनिष्ठ लिपिक करमनकर, तसेच प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भेंडेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यात उपविभागीय जलसंधारण अधिकारी सचिन शिंदे, एस. मोहोड आदींनी शेतकऱ्यांना वाढीव मोबदला अदा करण्यासाठी अमरावती विभागाच्या मृद आणि जलसंधारण अधिकाऱ्यांना आवश्यक सुधारित अंदाजपत्रकासाठी मंजुरी मागितल्याची माहिती दिली. यासाठी विधी व न्याय विभागाचा अभिप्राय आवश्यक असल्याचेही सांगितले. ही कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याची मागणी दिलीप भेंडेकर यांनी केली आणि ती वेळेत न झाल्यास १५ मार्चलाच प्रकल्पांवर आत्मदहन करण्याचा इशारा दिला.