कोरोना रुग्णांना जेवण देणारे स्वत: उपाशी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:43 AM2021-05-06T04:43:12+5:302021-05-06T04:43:12+5:30
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात आठ कोविड केअर सेंटर असून, ५०० पेक्षा अधिक रुग्ण दाखल आहेत. रुग्णालयामध्ये दररोज ...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात आठ कोविड केअर सेंटर असून, ५०० पेक्षा अधिक रुग्ण दाखल आहेत. रुग्णालयामध्ये दररोज रुग्णांचा आकडा वाढत आहे. यासोबतच रुग्णांच्या भोजनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर वाढली आहे. यासाठी पहाटेपासूनच कंत्राटदारांचा चमू कामाला लागलेला असतो. त्यात तेल, डाळ आणि इतर वस्तूंचे दर वाढल्याने कंत्राटदारांचे बजेट कोलमडले आहे. अशा परिस्थितीत बिल न निघाल्याने भोजन कंत्राटदारांचा आर्थिक डोलारा डळमळला आहे. भोजन पुरविल्यानंतर किमान महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देयक मिळावे, असा सूर कंत्राटदारांमधून उमटत आहे.
.....
काय दिले जाते जेवणात
कोरोना रुग्णांना जेवण देताना खास काळजी घेतली जाते. यामध्ये दररोज एका वेळला चार ते पाच चपात्या, दोन भाज्या, भात, वरण आणि सणाच्या वेळेला गोड पदार्थ दिला जातो.
सकाळी चहा आणि नाश्ता देण्यात येतो. सायंकाळी ४ वाजेदरम्यान चहा दिला जातो.
नाश्त्यामध्ये सात दिवस वेगवेगळे नियोजन करून सकाळी नाश्ता पुरविला जातो.
......
भोजनासह चहा, नाश्ताही
कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाल्यापासून सुटी होईपर्यंत वेळेवर जेवण पोहोचले. वरच्या मजल्यावर येऊन आवाज दिला जातो. जेवणामध्ये पोळ्या, भाजी, भात याचा समावेश असतो. याशिवाय सकाळी नाश्ता, चहा आणि सायंकाळी चहा दिला जातो.
- एक रुग्ण
................
जेवणामध्ये दोन भाज्या आहेत. कधी, कधी सलादही दिले जाते. सकाळी पोहे, मटकी असा नाश्ता असतो. नियमित वेळेवर नाश्ता, चहा व भोजन दिले जाते. भोजनाचा दर्जा बरा आहे. ड्रायफूटचा यामध्ये समावेश केल्यास आणखी बरे होईल.
-एक रुग्ण
-----------------------कोट
आम्ही गत अनेक महिन्यांपासून जेवणाचे कंत्राट नियमाप्रमाणे पार पाडत आहोत. प्रत्येकाला वेळेवर जेवण पुरविले जात आहे. मात्र, गत दोन महिन्यांपासून जेवणाचे बिलच निघाले नाही. लवकरच बिल दिले जाईल, असे सांगण्यात येत आहे. बिलास विलंब झाला की आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
- अनुसया बचत गट, वाशिम
---------------------------------कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना नियमित भोजन दिले जात आहे. डाळी व अन्य अन्नधान्याच्या किंमती भडकल्या आहेत. भोजन तयार करण्यासाठी सर्व चमू कार्यरत असतो. त्यांना महिन्याकाठी वेतन द्यावे लागते. त्यामुळे भोजनाचे देयक दर महिन्याला निघाले तर अडचणींचा सामना करण्याची वेळ येणार नाही.
- एक ठेकेदार
----------------------------------कोविड केअर सेंटरची संख्या ८
सध्या दाखल रुग्ण ५००
----------------------------