शेलुबाजार येथे गुराच्या बाजारात एकाच दिवशी सहाशेपेक्षा जास्त जनावरांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 04:02 PM2018-01-25T16:02:39+5:302018-01-25T16:04:26+5:30
मंगरुळपीर - तालुक्यात बुधवारी शेलुबाजार येथे गुराच्या बाजारात एकाच दिवशी सहाशेपेक्षा जास्त जनावरांची विक्री झाली .
मंगरुळपीर - यावर्षी तालुक्यात अपुरा पाउस पडल्याने ऐन हिवाळ्यातच पाणीटंचाई निर्माण झाली. याचा परिणाम चारा,व पाणीटंचाईमुळे गुराच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. मंगरुळपीर तालुक्यात बुधवारी शेलुबाजार येथे गुराच्या बाजारात एकाच दिवशी सहाशेपेक्षा जास्त जनावरांची विक्री झाली . यात दोनशेहुन अधिक बैल,गोरे,म्हशी तर तीनशेहुन अधिक शेळ्याचा समावेश होता.
मंगरुळपीर तालुक्यात यंदा वार्षिक सरासरीच्या केवल ४४ टक्के पाउस पडला आहे . परिणामी भुगर्भ जलपातळीत कमालीची घट झाली विहीरी,तलाव,आटल्या आहेत तालूक्यातील १५ प्रकल्पापैकी ६ प्रकल्प कोरडै पडले आहे . उर्वरीत ९ प्रकल्प मीळून १६ टक्के उपयुक्त जलसाठा उरलेला नाही . शेतशिवारात हिरवा चारा दिसत नाही ,पावसाअभावी कृषीउत्पादन घटल्याने सोयाबीन,तुर,मुग,उडीद,आदी धान्याचे कुटारही पुरेसे उपलब्ध नाही .त्यातच तालुक्यात ज्वारीचा पेरा नसल्याने आणी बोंडअळीने कपासी खाल्याने कडबा, सरकीसुध्दा दिसेनासी झाली आहे . अर्थात जनावराच्या चार्याचे सर्व स्रोतच अक्षम झाल्याने तालुक्यात अतीभिषण चाराटंचाई आणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे .मग जनावरे पाळावी कशी? हा यक्षप्रश्न पशुपालकासमोर निर्माण झाला आहे . त्यामुळे मुक्या जीवाला चाऱ्या , पाण्याविना ठेवुन हाल केल्यापेक्षा कुठेतरी चाऱ्याची व्यवस्था या उद्देशाने बहुतांश पशुपालक जनावरांची विक्री करीत आहेत .