कारखेडा जिल्हा परिषद शाळेत ‘सेमी इंग्रजी’; विद्यार्थ्यांची झाली सोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 04:34 PM2020-07-25T16:34:17+5:302020-07-25T16:34:38+5:30

शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी घेतलेला पुढाकार कौतुकाचा विषय ठरला आहे.

‘Semi English’ in Karkheda Zilla Parishad School; Convenience for students! | कारखेडा जिल्हा परिषद शाळेत ‘सेमी इंग्रजी’; विद्यार्थ्यांची झाली सोय!

कारखेडा जिल्हा परिषद शाळेत ‘सेमी इंग्रजी’; विद्यार्थ्यांची झाली सोय!

Next

- बबन देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षण द्यावे तसेच शहरी भागाकडे जाणाºया विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेतही दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळू शकते, हे पटवून देण्यासाठी मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत यावर्षीपासून सेमी इंग्रजीच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी घेतलेला पुढाकार कौतुकाचा विषय ठरला आहे.
तालुक्यातील कारखेडा येथील जि.प. शाळेत इयत्ता एक ते चार वर्ग असुन पटसंख्या १०० आहे. संपुर्ण चारही वर्ग डिजीटल आहे. शिक्षकांनी यार्षीपासुन अभिनव मोहीम हाती  घेतली. गावातील अनेक विद्यार्थी मानोरा शहराकडे शिक्षणासाठी धाव घेत आहेत. इंग्रजी, सेमी इंग्रजी शिक्षण शहरातच मिळते, ग्रामिण भागात मिळत नाही, असा पालकांचा समज आहे. हा समज खोडून काढण्यासाठी तसेच जि.प. शाळेला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक गोविंद पोतदार, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष मिना विनोद ढोके व सदस्य, शिक्षक रणजित जाधव, उषा शिंदे व कविता चौधरी यांनी स्वयंस्फुर्तीन एक ठराव घेऊन, जिल्हा परिषदेकडे सेमी इंग्रजी शिक्षणाची मान्यता मागीतली. परंतु काही तांञीक अडचणीमुळे मान्यता देण्यात अडचण होती. तरीसुद्धा शिक्षकांनी पालक व गावातील काही मंडळींना विश्वासात घेऊन गावातील विद्यार्थी घडावा यासाठी स्वत: सेमी इंग्रजीला सुरूवात  केली. त्यासाठी लागणारे पुस्तके अमरावती येथून बोलावण्याचा संकल्प केला. त्यामुळे पाल्याचा प्रवेश घेण्यासाठी जि.प. शाळेकडे पालकांचा कल वाढत आहे.
 
लोकवर्गणीचाही संकल्प
जि.प. शाळेत कार्यरत शिक्षक रणजित जाधव हे बिएससी, एम.एड. आहेत.  त्यांच्या शिक्षणाचा फायदा विद्यार्थी घडविण्यासाठी होऊ शकतो. इंग्रजी. जि प शिक्षकानी घेतलेल्या निर्णयाचे गावकºयांनी स्वागत केले आहे. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणासाठी पहील्या वर्षी किमान ५० हजार रुपये लोकवर्गणी जमा करण्याचा संकल्प केला. 

Web Title: ‘Semi English’ in Karkheda Zilla Parishad School; Convenience for students!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.