एम.एस.गोटे महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:36 AM2021-03-14T04:36:30+5:302021-03-14T04:36:30+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जी.एस. कुबडे तर प्रमुख अतिथी म्हणून संजय गोटे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. व्ही.एन. लांडे यांची ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जी.एस. कुबडे तर प्रमुख अतिथी म्हणून संजय गोटे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. व्ही.एन. लांडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. बी.आर. तनपुरे यांनी केले. त्यांनी भारताच्या पारतंत्र्यापासून ते स्वातंत्र्यापर्यंत झालेल्या विविध चळवळींचा आणि स्वातंत्र्यवीरांच्या कार्याचा आढावा घेतला. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये १८५७ चा रणसंग्राम ते १९४२ च्या चलेजाव आंदोलनापर्यंत अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तसेच आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, मदनलाल धिंग्रा व सुभाषचंद्र बोस यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल घटनावर माहिती दिली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. व्ही.एन. लांडे यांनी १८५७ च्या उठावातील नानासाहेब पेशवे ,राणी लक्ष्मीबाई, कुंवरसिंह, तात्या टोपे, बहादूरशहा जफर यांच्या कार्याची माहिती दिली. युवकांनी अशा थोर स्वातंत्र्यसेनानींचा आदर्श घेऊन देशासाठी स्वत:ला समर्पित करण्याचे आवाहन याप्रसंगी केले. डॉ. जी.एस. कुबडे व संजय गोटे यांनी आज देशाला भारताच्या वास्तविक इतिहासाची, मिळालेल्या स्वातंत्र्याची जाणीव व जागृती निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार रासेयो सह कार्यक्रमाधिकारी डॉ. व्ही. बी. चांदजकर यांनी केले. याप्रसंगी डॉ. फिरोज खान, डॉ. एस. व्ही. रूक्के, डॉ. डी.आर. दामोदर, डॉ. डी. एन. लांजेवार, डॉ. व्ही. ई. डोणगांवकर, प्रा. बी. डी. पट्टेबहाद्दूर, डॉ. आर. जी. बोंडे आदींची उपस्थिती होती.