लसीचा डोस नसल्याने ज्येष्ठ नागरीक घरी परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 06:35 PM2021-05-13T18:35:01+5:302021-05-13T18:35:26+5:30

Washim News : लसीचा डोस उपलब्ध नसल्याची माहिती मिळाल्यानंतर, हतबल होउन घरी परतावे लागले.

The senior citizen returned home due to lack of vaccine dose | लसीचा डोस नसल्याने ज्येष्ठ नागरीक घरी परतले

लसीचा डोस नसल्याने ज्येष्ठ नागरीक घरी परतले

Next

रिसोड : लस घेण्यासाठी रिसोड शहरातील केंद्रांसमोर सकाळी सात वाजतापासूनच रांगेत उभे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास लसीचा डोस उपलब्ध नसल्याची माहिती मिळाल्यानंतर, हतबल होउन घरी परतावे लागले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात येत आहे. रिसोड शहरात लसीकरण केंद्रासमोर गर्दी होत असून, लसीचादेखील तुटवडा जाणवतो. १३ मे रोजी लसीच्या दुसऱ्या डाेससाठी शहरातील नागरिकांनी सकाळपासूनच गेटच्या बाहेर रांगा केल्या होत्या. परंतु कोव्हंक्सिनचा डोस उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना परत जावे लागले. रिसोड तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी १५० कोव्हंक्सिनचा डोस देण्यात आला आणि ग्रामीण रुग्णालयाकरिता कोव्हिशिल्डचा डोस उपलब्ध आहे. कोव्हंक्सिनचा साठा संपल्याने चार ते पाच तासानंतर ज्येष्ठ नागरिकांना परत जावे लागले. चार ते पाच तास रांगेत उभे राहूनही डोस न मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मागील दोन दिवसात नगर परिषद शाळेमध्ये ३११ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. परंतु १३ मे ला डोस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली.

प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता कोव्हंक्सिनचा डाेस उपलब्ध आहे आणि ग्रामीण रुग्णालयकरिता कोव्हिशिल्डचा डोस उपलब्ध आहे .

डॉ पी एन फोफसे,
तालुका आरोग्य अधिकारी रिसोड

Web Title: The senior citizen returned home due to lack of vaccine dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.