‘लकी ड्रॉ’व्दारे तयार होणार फळबाग लागवडीची ज्येष्ठता यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 02:35 PM2018-08-13T14:35:41+5:302018-08-13T14:37:07+5:30

५० ते ६० शेतकºयांनाच प्रत्यक्ष लाभ मिळणार असून त्यासाठी ‘लकी ड्रॉ’ पद्धतीने शेतकºयांची ज्येष्ठता यादी तयार केली जाणार आहे.

Seniority list of Horticulture Cultivation will be prepared by Lucky Draw | ‘लकी ड्रॉ’व्दारे तयार होणार फळबाग लागवडीची ज्येष्ठता यादी

‘लकी ड्रॉ’व्दारे तयार होणार फळबाग लागवडीची ज्येष्ठता यादी

Next
ठळक मुद्दे स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत वाशिम तालुक्यातील २०० पेक्षा अधिक शेतकºयांनी अर्ज सादर केले आहेत. १४ आॅगस्ट रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी अभिजित देवगिरीकर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत वाशिम तालुक्यातील २०० पेक्षा अधिक शेतकºयांनी अर्ज सादर केले आहेत. त्यामधून तालुक्याला मिळालेल्या २४ लाखांच्या उद्दीष्टानुसार साधारणत: ५० ते ६० शेतकºयांनाच प्रत्यक्ष लाभ मिळणार असून त्यासाठी ‘लकी ड्रॉ’ पद्धतीने शेतकºयांची ज्येष्ठता यादी तयार केली जाणार आहे. त्यानुषंगाने मंगळवार, १४ आॅगस्ट रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी अभिजित देवगिरीकर यांनी दिली.
स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्यशासनाने कृषि विभागाला दिले आहेत. त्यानुसार, तालुकानिहाय २४ लाख रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला. दरम्यान, या निधीस अनुसरून पात्र शेतकºयांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित करावे आणि यायोगे फळबाग लागवडीचे प्रमाण वाढविण्याचा शासनाचा मानस आहे. 
शासनाच्या निर्देशानुसार स्थानिक पातळीवर कृषि विभागाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत इच्छुक शेतकºयांनी फळबाग लागवडीसाठी तयारी दर्शवित अर्ज केले असून सोमवारपर्यंत वाशिम तालुक्यातून २०० शेतकºयांचे अर्ज कृषि विभागाला प्राप्त झाले आहेत. दरम्यान, कुणावरही अन्याय होऊ नये, या उद्देशाने प्राप्त अर्जांमधून ज्येष्ठता यादी तयार करण्यासाठी ‘लकी ड्रॉ’ पद्धत राबविली जाणार आहे. या कार्यक्रमास अर्जदार शेतकºयांसह नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी देवगिरीकर यांनी केले आहे.

Web Title: Seniority list of Horticulture Cultivation will be prepared by Lucky Draw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.