मोप प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणा दरम्यान जेष्ठांची झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:42 AM2021-03-27T04:42:50+5:302021-03-27T04:42:50+5:30
यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा होत आहे. ही बाब कोरोना संसर्गवाढीकरिता घातक आहे. मोप प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत आजपर्यंत ...
यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा होत आहे. ही बाब कोरोना संसर्गवाढीकरिता घातक आहे.
मोप प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत आजपर्यंत ६०८ जेष्ठ महिला-पुरुषांना कोविड लसीकरण करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ.अशिष सिंह यांनी दिली. परंतु मोप प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील अनेक दिवसांपासून आरोग्य विभागातील तीन एमपी डब्ल्यू, एक असिस्टंट, एक फार्मासिस्ट, तर दोन चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कमी असल्याने आरोग्य सेवेत व्यत्यय येत असल्याची माहिती डाॅ.अशिष सिंह यांनी दिली. मोप प्राथमिक आरोग्य कर्मचारी वर्गाच्या तुटवड्यासंदर्भात अधिक माहितीसाठी तालुका आरोग्य अधिकारी पी.एन. फोफसे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी दूरध्वनी उचलला नाही.
कोरोना रॅपिड, आरटीपीसीआर चाचण्या घेतल्या चार ते पाच दिवसांनी तपासणी अहवाल येतो. हा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याचे समजेपर्यंत सदर व्यक्ती शेकडो व्यक्तीच्या संपर्कात आलेला असतो. यामुळे काेराेना संसर्गाची साखळी वाढत आहे. यासाठी आरोग्य विभागाने दक्षता घेत. ग्रामपंचायत अंतर्गत आरोग्य समित्याद्वारे नमुने देणाऱ्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करावे, अशी मागणी आहे.