निवासी अतिक्रमणाच्या जमिनीचे शुल्क जमा करण्यासाठी स्वतंत्र लेखाशिर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:21 PM2020-01-11T12:21:53+5:302020-01-11T12:21:59+5:30
स्वतंत्र जमा लेखाशिर्ष अर्थात खाते उपलब्ध करून देण्यास शासनाने ९ जानेवारीच्या परिपत्रकान्वये मान्यता दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यात निवासी प्रयोजनार्थ केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत यापूर्वी निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार जे अतिक्रमण नियमानुकूल केले असेल, त्याची शासकीय दरानुसार ठरलेली रक्कम जमा करण्यासाठी करण्यासाठी आवश्यक स्वतंत्र जमा लेखाशिर्ष अर्थात खाते उपलब्ध करून देण्यास शासनाने ९ जानेवारीच्या परिपत्रकान्वये मान्यता दिली आहे.
राज्यातील ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमानुकू ल करण्याचे धोरण १६ फेब्रुवारी २०१८ च्या आदेशान्वये विहित करण्यातआले असून, याबाबत २० आॅगस्ट २०१८ च्या परिपत्रकान्वये विस्तृत मार्गदर्शक सूचना शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. या धोरणांतर्गत राज्यातील विविध भागांतील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात आली आहेत. यासाठी शासनाने शुल्कही निर्धारित केले होेते. त्यामुळे यातून प्राप्त होणाऱ्या शुल्कापैकी ९० टक्के रक्कम शासनाच्या खात्यावर जमा करण्यात येणार असून, त्या संदर्भातील सुचना दिल्या आहेत. ही रक्कम ज्या लेखाशिर्षाखाली जमा करावयाची आहे. ते लेखाशिर्ष उपलब्ध करून देण्यास शासनाने शासनाने ९ जानेवारीच्या परिपत्रकाद्वारे मान्यता दिली आहे. त्यानुसार शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनार्थ केलेल्या आणि शासन धोरणानुसार नियमित केलेल्या अतिक्रमणतून निर्धारित दरानुसार प्राप्त होणारे शुल्क संबंधित लेखाशिर्षातंर्गत जमा होणार आहे.