सर्पमित्रांकडून चार दिवसांत १९ सापांना जीवदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:45 AM2021-08-24T04:45:32+5:302021-08-24T04:45:32+5:30

वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या सदस्यांनी गत महिनाभरात ८२ सापांना जीवदान देण्याचे कार्य केले आता त्यात आणखी १९ सापांची भर ...

Serpent friends save 19 snakes in four days! | सर्पमित्रांकडून चार दिवसांत १९ सापांना जीवदान!

सर्पमित्रांकडून चार दिवसांत १९ सापांना जीवदान!

googlenewsNext

वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या सदस्यांनी गत महिनाभरात ८२ सापांना जीवदान देण्याचे कार्य केले आता त्यात आणखी १९ सापांची भर पडली आहे. या टीमच्या सर्पमित्र सदस्यांनी कोलार, पेडगाव, मंगरुळपीर, चिस्ताळा, गोगरी आणि मानोरा येथे आढळून आलेल्या सापांना सुरक्षित पकडत जंगलात सोडले. यात मण्यार, नाग आणि घोणस जातीच्या विषारी सापांसह डुरक्या घोणस, वाळा, कवड्या, धामण, गवत्या, तस्कर आणि पानदिवड जातीच्या बिनविषारी सापांचा समावेश होता. अतुल डापसे, नंदू सातपुते बुद्धभूषण सुर्वे, अनिकेत इंगळे, आरती इंगोले, दीपक राऊत, कीर्तिराज भगत, अक्षय इंगळे, वैभव सुर्वे, अजय डांगे, राहुल साखरे, प्रतीक टोंचर, विष्णू गावंडे, प्रवीण अंबोरे, उमेश जंगले, राहुल साखरे, सुरज कोंगे, दत्ता साबळे आदी सर्पमित्रांनी जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनात हे साप पकडले. यासंदर्भात वनविभागाला माहिती देण्यात आली आहे.

-----------------

साप आढळल्यास माहिती देण्याचे आवाहन

मंगरुळपीर, मानोरा तालुक्यासह इतर ठिकाणी मानवी वस्तीत साप आढळून आल्यास लोकांनी सापाला न मारता आणि न डिवचता वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमचे सर्पमित्र अथवा परिसरातील इतर कोणत्याही सर्पमित्रांना याबाबत माहिती द्यावी आणि सापांचा जीव वाचविण्यासह जैवविविधता टिकविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक, तथा पर्यावरण अभ्यासक गौरवकुमार इंगळे, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमचे अध्यक्ष श्रीकांत डापसे आणि उपाध्यक्ष आदित्य इंगोले यांनी केले आहे.

Web Title: Serpent friends save 19 snakes in four days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.