सेवा सहकारी संस्थांकडून १० टक्के ‘शेअर्स’ कपातीचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:29 AM2021-06-25T04:29:09+5:302021-06-25T04:29:09+5:30

वाशिम : जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सेवा सहकारी संस्थांमार्फत खरीप हंगामात पीक कर्ज वाटप करणे सुरू आहे; मात्र नव्याने पीककर्ज ...

Seva co-operatives cut 10 per cent of their shares | सेवा सहकारी संस्थांकडून १० टक्के ‘शेअर्स’ कपातीचा धडाका

सेवा सहकारी संस्थांकडून १० टक्के ‘शेअर्स’ कपातीचा धडाका

googlenewsNext

वाशिम : जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सेवा सहकारी संस्थांमार्फत खरीप हंगामात पीक कर्ज वाटप करणे सुरू आहे; मात्र नव्याने पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना नियमानुसार कर्ज मंजूर झाल्यानंतर रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करण्यापूर्वीच ‘शेअर्स’च्या नावाखाली तब्बल १० टक्के रक्कम कापून घेतली जात आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पीक कर्ज घेणाऱ्या जिल्हाभरातील शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी १०२५ कोटी रुपये कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले असून आतापर्यंत सर्वाधिक कर्ज वाटप हे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडूनच झालेले आहे. दरम्यान, सेवा सहकारी संस्थांमार्फत शेतकरी सभासदांना पीक कर्ज वाटप करण्यात येत आहे. नियमानुसार गतवर्षीपर्यंत नव्याने पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यातून ५ टक्के रक्कम ‘शेअर्स’च्या नावाखाली कपात केली जात असे. ती यावर्षीपासून १० टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

यासंबंधी भूमिपूत्र शेतकरी संघटनेने रिसोड येथील सहकारी संस्थेच्या सहायक निबंधकांकडे तक्रार दाखल केली. प्रत्यक्षात मात्र सहायक निबंधकही याबाबत अनभिज्ञ असून त्यांनी २३ जूनला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वरिष्ठ निरीक्षकांकडे पत्रव्यवहार करून बँकेने सहकारी संस्थांना शेतकऱ्यांना मंजूर होणाऱ्या कर्जाच्या रकमेतून १० टक्के शेअर्स कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत का? असल्यास तसे परिपत्रक सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

...................

कोट :

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जातो; मात्र, शेतकरी सभासदांना त्याचे वाटप सेवा सहकारी संस्थांमार्फत केले जाते. सेवा सहकारी संस्थाच शेतकऱ्यांकडून ‘शेअर्स’ची रक्कम आकारतात. ‘शेअर्स’च्या रकमेत वाढ झाली असल्यास त्याबाबत माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल.

- अनंत वैद्य

मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा मध्यवर्ती बँक, अकोला

...................

कोट :

विविध स्वरूपातील अडचणींमुळे शेतकरी आधीच संकटात सापडलेले आहेत. अशा स्थितीत त्यांना खरीप हंगामात वेळेवर पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सक्तीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा मधवर्ती बँकेशी जुळलेल्या सेवा सहकारी संस्थांनी ‘शेअर्स’ची रक्कम वाढवू नये, असे निर्देशही देण्यात येतील.

- शन्मुगराजन एस.

जिल्हाधिकारी, वाशिम

.....................................

कोट :

जिल्ह्यातील सुमारे ८० टक्के सेवा सहकारी संस्था अवसायनात निघाल्या आहेत. असे असताना संस्थांचे नाव पुढे करून जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवर डोळा ठेवून आहे. गतवर्षीपर्यंत नव्याने पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून ‘शेअर्स’च्या गोंडस नावाखाली ५ टक्के रक्कम कापून घेतली जायची. ते प्रमाण यंदापासून १० टक्के करण्यात आले आहे. हा अन्याय असून बँकेने तो दूर करायला हवा.

- विष्णूपंत भुतेकर

संस्थापक, भूमिपुत्र शेतकरी संघटना

Web Title: Seva co-operatives cut 10 per cent of their shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.