भूली येथे विषबाधेने सात गायींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:43 AM2021-05-11T04:43:53+5:302021-05-11T04:43:53+5:30
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, भुली येथील पशुपालकांच्या गायी नित्यनेमाप्रमाणे रानात चरायला गेल्या होत्या. यादरम्यान शेतातील कोवळ्या ज्वारी पिकाचे कोमटे सेवनात ...
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, भुली येथील पशुपालकांच्या गायी नित्यनेमाप्रमाणे रानात चरायला गेल्या होत्या. यादरम्यान शेतातील कोवळ्या ज्वारी पिकाचे कोमटे सेवनात आल्याने सात गायींचा मृत्यू झाला, तर १२ गायींची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच मानोरा येथील पशुधन विभागाचे डाॅ. पी. एच. चव्हाण, डाॅ. लोखंडे, डाॅ. नंदू डेरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन २० ते २५ गायींवर तत्काळ उपचार करून त्यांचे प्राण वाचविले. या घटनेमुळे संबंधित पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
..................
कोट :
शेतकऱ्यांनी पिकलेली ज्वारी सोंगल्यानंतर तत्काळ शेतात नांगरणी करून घ्यावी. पशुपालकांनीही खबरदारी बाळगून कोवळे कोमटे उगवलेल्या शेतात जनावरे चरायला सोडू नये; अन्यथा विषबाधा होऊन जनावरे दगावू शकतात.
डॉ. पी. एच. चव्हाण