ट्रॅक्टरच्या अनुदानासाठी अर्ज करण्याकरिता सात दिवसाची मुदत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 10:27 PM2017-10-22T22:27:25+5:302017-10-22T22:28:43+5:30
राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत फलोत्पादनासाठी २० अश्वशक्ती पर्यंतचा ट्रॅक्टर, ८ अश्वशक्ती पेक्षा कमी क्षमतेची पॉवर टिलर, ८ अश्वशक्ती पेक्षा जास्त क्षमतेची पॉवर टिलर, २० अश्वशक्ती पेक्षा कमी क्षमतेचे ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर चलित अवजारे, स्वयंचलित फलोत्पादन अवजारे, पीक संरक्षण उपकरणे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतक-यांना २९ आॅक्टोंबर आॅनलाईन अर्ज व लेखी अर्ज सादर करावे लागणार आहेत,
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत फलोत्पादनासाठी २० अश्वशक्ती पर्यंतचा ट्रॅक्टर, ८ अश्वशक्ती पेक्षा कमी क्षमतेची पॉवर टिलर, ८ अश्वशक्ती पेक्षा जास्त क्षमतेची पॉवर टिलर, २० अश्वशक्ती पेक्षा कमी क्षमतेचे ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर चलित अवजारे, स्वयंचलित फलोत्पादन अवजारे, पीक संरक्षण उपकरणे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतक-यांना २९ आॅक्टोंबर २०१७ पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे आॅनलाईन अर्ज व लेखी अर्ज सादर करावे लागणार आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. एस. गावसाने यांनी सांगितले.
शेती करणे सुलभ व्हावे, या दृष्टिकोनातून शेतकºयांना अनुदानावर विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध करून दिले जाते. राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत फलोत्पादनासाठी विविध प्रकारच्या ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहेत तसेच स्वयंचलित फलोत्पादन अवजारे, पीक संरक्षण उपकरणे आदींसाठी अनुदान दिले जाणार आहे. शेतकºयांना संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे लेखी व आॅनलाईन पध्दतीने ‘हॉर्टनेट’ या संकेतस्थळावर अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. शासनाच्या सुधारित सूचनेनुसार योजनेचा लाभ घेण्यासाठी प्राप्त अर्जामधून लाभार्थींची निवड लॉटरी पध्दतीने करण्यात येणार आहे. पूर्व संमती न घेता प्रकल्प राबविलेले शेतकरी अनुदानासाठी पात्र समजले जाणार नाहीत. जास्तीत जास्त शेतकºयांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांचेकडे आपले अर्ज २९ आॅक्टोंबर २०१७ पर्यंत सादर करावे लागणार आहेत.