सात दिवसात वाशिम तालुक्यात आढळले २१४ कोरोना रुग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 03:42 PM2021-03-08T15:42:26+5:302021-03-08T15:42:46+5:30

CoronaVirus News शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांची चिंताही वाढली आहे.

In seven days, 214 corona patients were found in Washim taluka | सात दिवसात वाशिम तालुक्यात आढळले २१४ कोरोना रुग्ण 

सात दिवसात वाशिम तालुक्यात आढळले २१४ कोरोना रुग्ण 

Next

वाशिम : मार्च महिन्यात सुरूवातीच्या सात दिवसात वाशिम शहरात १३६ आणि ग्रामीण भागात ७८ असे एकूण २१४ कोरोना रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला. शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांची चिंताही वाढली आहे.
देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. वाशिम शहरात जून महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. आॅगस्ट ते सप्टेंबर २०२० या दरम्यान वाशिम शहरासह तालुक्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून व्यापाºयांनी स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यूही पाळला. याला वाशिमकरांचा चांगलाच प्रतिसाद लाभला. आॅक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खालावला. जानेवारी महिन्यापर्यंत हा आलेख खालावलेला होता. फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीला कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ उतार येत १४ फेब्रुवारीपासून अचानक कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. मार्च महिन्यात यामध्ये आणखी वाढ झाली. वाशिम शहरातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे ठरत आहे. ग्रामीण भागातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. गत सात दिवसात वाशिम शहरात १३६ आणि ग्रामीण भागात ७८ असे एकूण २१४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संदिग्ध रुग्णांची तपासणी आणि कोरोना चाचणी केली जात आहे. नागरिकांनीदेखील सतर्क राहावे, असे आवाहन तालुका प्रशासन व आरोग्य विभागाने केले.

Web Title: In seven days, 214 corona patients were found in Washim taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.