डाळींब पिकाचा विमा उतरविण्यासाठी सात दिवस शिल्लक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 04:09 PM2017-10-23T16:09:39+5:302017-10-23T16:10:55+5:30
वाशिम : प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना सन २०१७-१८ या वर्षात राबविली जात आहे. डाळींब पिकासाठी विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ आॅक्टोंबर २०१७ पर्यंत आहे. वाशिम तालुक्यातील पात्र शेतकºयांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी अभिजीत देवगिरकर यांनी सोमवारी केले.
डाळींब या फळपिकासाठी वाशिम तालुक्यातील पार्डीआसरा, राजगाव, पार्डीटकमोर, नागठाणा या मंडळांचा समावेश आहे. विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी १ लक्ष १० हजार रुपये असून एकूण विमा हप्ता ४४ हजार २७५ रुपये आहे. यापैकी शेतकºयांना केवळ ५ हजार ५०० रुपये विमा हप्ता भरावा लागणार असून उर्वरित विमा हप्त्याची रक्कम शासन भरणार आहे. डाळिंब पिकासाठी विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ आॅक्टोंबर २०१७ पर्यंत आहे. संत्रा फळपिकासाठी वाशिम तालुक्यातील वाशिम, अनसिंग, केकतउमरा, पार्डीआसरा, राजगाव या मंडळाचा समावेश आहे. संत्रा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी ७० हजार रुपये असून एकूण विमा हप्ता २६ हजार रुपये आहे. यापैकी शेतकºयांना ३ हजार ५०० रुपये विमा हप्ता भरावा लागणार असून उर्वरित रककम शासन भरणार आहे. संत्रा पिकासाठी विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत आहे.
लिंबूसाठी वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोरे या महसूल मंडळाचा प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे. या फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी ६० हजार रुपये आहे. याकरिता एकूण विमा हप्ता ३३, १९२ रुपये आहे, यापैकी शेतकºयांना केवळ ३ हजार रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे असून उर्वरित विमा हप्ता शासन भरणार आहे. लिंबू पिकासाठी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १४ नोव्हेंबर २०१७ पर्यंत आहे.जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी देवगिरकर यांनी केले.