कार अपघातात सात जण जखमी
By admin | Published: November 20, 2015 02:14 AM2015-11-20T02:14:11+5:302015-11-20T02:14:11+5:30
कारचालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने अपघात.
कारंजा (जि. वाशिम): देवदर्शन आटोपल्यानंतर गावाकडे परतताना झालेल्या कार अपघातात सात जण जखमी झाले. ही घटना १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बग्गी शिवारातील नसई फाट्याजवळ घडली. शिर्डी, शेगाव येथील देवदर्शन आटोपल्यानंतर एमएच ३५ पी -६७५0 क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने खोब्रागडे व परतेके कुटुंब औरंगाबाद- नागपूर महामार्गावरून नागपूरकडे जात होती. मार्गात नसई फाट्याजवळ कारंजाकडून एक वाहन अचानक समोर आल्याने कारचालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले. यामध्ये कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खड्डय़ात जाऊन कोसळली. परिणामी या अपघातात विनोद परतेके (४५), अमित खोब्रागडे (४0), सीमा खोब्रागडे (३२), मालती विनोद परतेके (३५), विधान अमित खोब्रागडे (७), ईशिका विनोद परतेके (११) व राजवीर खोब्रागडे (१३) सर्व रा. गोंदिया हे जखमी झाले. जखमींना येथील मानवसेवा हेल्पलाइनचे सै. मुजाहिद, नसीमभाई व इतरांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. प्रथमोपचारानंतर सर्वांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविण्यात आले.