जिल्ह्यात आणखी सात जण कोरोना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:43 AM2021-02-09T04:43:10+5:302021-02-09T04:43:10+5:30
डिसेंबर व जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून आला. फेब्रुवारी महिन्यातही रुग्णसंख्येत चढउतार दिसून येत आहेत. सोमवारी (दि. ...
डिसेंबर व जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून आला. फेब्रुवारी महिन्यातही रुग्णसंख्येत चढउतार दिसून येत आहेत. सोमवारी (दि. ८) एकूण सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील शिव चौक येथील १, नवीन पोलीस वसाहत परिसरातील १, वारा येथील १, मालेगाव तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील १, मंगरुळपीर तालुक्यातील पारवा येथील १, शहापूर येथील १, कारंजा शहरातील आशाताई गावंडे कॉलनी परिसरातील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ७,२४२ वर पोहोचला आहे. सोमवारी १२ जणांना रुग्णालयातून सुटी झाली. आतापर्यंत कोरोनामुळे १५५ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाचा आलेख खाली येत असला तरी कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००००
१२३ जणांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत ७,२४२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,९६३ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाचे स्पष्ट केले.