वाशिम जिल्ह्यातील सात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 04:12 PM2019-02-18T16:12:16+5:302019-02-18T16:12:23+5:30
वाशिम: लोकसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने पोलीस अधिकाºयांच्या बदलीबाबत ठरवून दिलेल्या निकषानुसार जिल्ह्यातील ७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: लोकसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने पोलीस अधिकाºयांच्या बदलीबाबत ठरवून दिलेल्या निकषानुसार जिल्ह्यातील ७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभुमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पोलीस अधिकाºयांच्या बदल्यांबाबत निकष ठरवून दिले होते. त्या निकषांना अनसरून पासेली महासंचालक म.रा. मुंबई यांच्या २ फेब्रुवारी रोजीच्या परिपत्रातील निर्देश आणि सुचनांच्या अनुषंगाने व परिक्षेत्रीय पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीसी पोलीस महासंचालकांनी दिलेल्या मान्यतेनुसार अमरावती परिक्षेत्रांतर्गत नि:शस्त्र पोलीस अधिकाºयांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील सात पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. त्यात मंगरुळपीरचे पोलीस निरीक्षक रमेश बाजीराव जायभाये यांची बुलडाणा जिल्ह्यात, रिसोडचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांची अमरावती ग्रामीण, कारंजाचे ग्रामीणचे निरीक्षक गजानन गुल्हाने यांची अकोला, शिरपूरचे निरीक्षक हरीष गवळी यांची अकोला, मालेगावचे निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांची अकोला, कारंजा शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक मोतीराम बोडखे यांची बुलडाणा, जऊळकाचे ठाणेदार पितांबर जाधव यांची यवतमाळ येथे प्रशासकीय बदली करण्यात आली आहे.