नागपंचमीच्या पूर्वसंध्येला सात सापांना जीवदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:46 AM2021-08-14T04:46:20+5:302021-08-14T04:46:20+5:30

नागपंचमीच्या दिवशी नागाची पुजा केली जात असली तरी सापांबाबत अनेक गैरसमज असल्याने सहसा साप दिसताच त्याला ठार करण्याचा प्रयत्न ...

Seven snakes saved on the eve of Nagpanchami! | नागपंचमीच्या पूर्वसंध्येला सात सापांना जीवदान!

नागपंचमीच्या पूर्वसंध्येला सात सापांना जीवदान!

Next

नागपंचमीच्या दिवशी नागाची पुजा केली जात असली तरी सापांबाबत अनेक गैरसमज असल्याने सहसा साप दिसताच त्याला ठार करण्याचा प्रयत्न केला जातो. सापांबाबत अनेक भ्रामक संकल्पना असल्यानेही सापांविषयी माणसाच्या मनात भीती आणि घृणाच असते. तथापि, साप हा निरूपद्रवी जीव असून, केवळ स्वत:चे रक्षण करण्यासाठीच तो चावा घेतो. सर्वच साप विषारी नसतात, हे पटवून देण्याचे कार्य वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमचे सर्पमित्र सदस्य करीत आहेत. त्यांनी आजवर हजारो सापांना सुरक्षित पकडून जंगलात सोडत जीवदानही दिले आहे. नागपंचमीच्या पूर्वसंध्येलाही त्यांनी तीन नाग, एक मण्यार अशा चार विषारी सापांसह दोन धामण आणि एक कवड्या जातीचा साप मिळून सात सापांना जीवदान देत समाजासमोर सापाच्या रक्षणाचा आणि जैवविविधतेचा संदेश दिला.

Web Title: Seven snakes saved on the eve of Nagpanchami!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.