सर्पमित्रांकडून सात सापांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:42 AM2021-07-27T04:42:52+5:302021-07-27T04:42:52+5:30

---------------- ६३ हजार विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा वाशिम : मोफत गणवेश योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र ६२९०१ विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दोन गणवेशप्रमाणे ३ ...

Seven snakes saved by serpent friends | सर्पमित्रांकडून सात सापांना जीवदान

सर्पमित्रांकडून सात सापांना जीवदान

Next

----------------

६३ हजार विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा

वाशिम : मोफत गणवेश योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र ६२९०१ विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दोन गणवेशप्रमाणे ३ कोटी ७७ लाख ४९ हजार ६०० रुपयांची मागणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केली असून, शाळेचे सत्र सुरू झाले असले तरी अद्याप शिक्षण विभागाला गणवेश वितरित करण्यासाठी निधी प्राप्त झाला नाही.

--------------------

पाणंद रस्त्याचे काम रखडलेलेच

वाशिम : कारंजा तालुक्यातील काजळेश्वर परिसरातील जुन्या पाणंद रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे पालकमंत्री योजनेतून या रस्त्याचे काम करण्याची मागणी गावातील ग्रामस्थांनी सरपंचांकडे गुरुवारी केली.

--------------------

अर्धवट तळ्यामुळे पशुपालकांंना अडचणी

वाशिम : सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत इंझोरी येथे सन २०१८-१९ मध्ये साठवण तळे मंजूर झाले. परंतु हे साठवण तळे पूर्ण होऊ शकले नाही. आता या अर्धवट तळ्यात जलसाठा होत असल्याने भूजल पातळीला आधार असला तरी, या तळ्यात गुरे पडण्याची भीती आहे.

----

काजळेश्वर ते खेर्डा रस्त्याची चाळण

काजळेश्वर : कारंजा तालुक्यातील काजळेश्वर ते खेर्डा रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, तर डांबरीकरण निघून खडी उघडी पडली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना मोठा त्रास होत आहे.

------------------

रस्ताकामाची ग्रामस्थांना प्रतीक्षा

उंबर्डा बाजार : गेल्या अनेक वर्षांपासून उंबर्डा बाजार-कामठवाडा या महत्त्वाच्या रस्त्याचे काम थंडबस्त्यात आहे. या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यास मंजुरी मिळूनही अद्याप या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही.

-----

Web Title: Seven snakes saved by serpent friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.