सात हजार विद्यार्थी देणार ‘टीईटी’

By admin | Published: December 13, 2014 12:26 AM2014-12-13T00:26:23+5:302014-12-13T00:26:23+5:30

रविवारी वाशिम शहरातील ३१ केंद्रांवर परीक्षा : परिक्षार्थींच्या संख्येत घट.

Seven thousand students will be given 'TET' | सात हजार विद्यार्थी देणार ‘टीईटी’

सात हजार विद्यार्थी देणार ‘टीईटी’

Next

वाशिम : गतवर्षीपासून राज्य शासनाने राज्यभरातील सर्व भावी शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टी.ई.टी.) अनिवार्य केली आहे. जिल्हाभरातून एकूण सात हजार ४७ परीक्षार्थी १४ डिसेंबर रोजी वाशिम शहरातील ३१ परीक्षा केंद्रावरून परीक्षा देणार आहेत. गतवर्षी १0 हजार ८00 परीक्षार्थींनी टीईटी परीक्षा दिली होती. शिक्षणाच्या अधिकार अधिनियमानुसार इयत्ता पहिली ते पाचवी तसेच इयत्ता सहावी ते आठवीला अध्यापन करणार्‍या शिक्षण सेवक उमेदवाराला सीईटी परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. ही शिक्षक पात्रता परीक्षा १४ डिसेंबर २0१४ रोजी वाशिम शहरातील ३१ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ३१ केंद्र संचालक, २३५ पर्यवेक्षक, ३१ सहायक पर्यवेक्षक तर पाच झोन ऑफिसर नियुक्त करण्यात आले आहेत. प्राथमिक शिक्षकांसाठी असणार्‍या पहिल्या पेपरसाठी ४६८३ परीक्षार्थी तर उच्च प्राथमिक शिक्षकांसाठी असणार्‍या पेपर दोनसाठी २३६४ परीक्षार्थींची नोंद झाली आहे. या परीक्षेवर शिक्षण विभाग देखरेख ठेवणार आहे.

Web Title: Seven thousand students will be given 'TET'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.