सात-बारा पुनर्शोधनात वाशिम आघाडीवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 07:33 PM2017-08-04T19:33:56+5:302017-08-04T19:36:15+5:30

वाशिम: शासनाने सर्व दस्तऐवजांचे संगणकीकरण करण्याचे ठरविल्यानंतर शेतकºयांसाठी आवश्यक असलेल्या सात-बारा या दस्तऐवजाचेही राज्यभरात संगणकीकरण करण्यात आले. तथापि, या प्रक्रियेनंतरही संगणकीकृत सातबारामध्ये त्रुटी आढळून आल्यानंतर शासनाच्यावतीने सात-बारा पुनर्शोधन अर्थात सात-बारा री एडिट कार्यक्रम राबविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. या प्रक्रियेत वाशिम जिल्हा आघाडीवर आहे.  

In the seven-twelve revisions, Washim leads the team | सात-बारा पुनर्शोधनात वाशिम आघाडीवर 

सात-बारा पुनर्शोधनात वाशिम आघाडीवर 

Next
ठळक मुद्दे५१ गावांचे अंतिम प्रमाणपत्र ७९ गावांतील सर्व्हे  दुरुस्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शासनाने सर्व दस्तऐवजांचे संगणकीकरण करण्याचे ठरविल्यानंतर शेतकºयांसाठी आवश्यक असलेल्या सात-बारा या दस्तऐवजाचेही राज्यभरात संगणकीकरण करण्यात आले. तथापि, या प्रक्रियेनंतरही संगणकीकृत सातबारामध्ये त्रुटी आढळून आल्यानंतर शासनाच्यावतीने सात-बारा पुनर्शोधन अर्थात सात-बारा री एडिट कार्यक्रम राबविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. या प्रक्रियेत वाशिम जिल्हा आघाडीवर आहे.  

सद्यस्थितीत जिल्ह्यातील ३२८ पैकी ७९ गावांतील सर्व्हे  दुरुस्ती पूर्ण करून ५१ गावांचे अंतिम प्रमाणपत्रांचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. शासनाने संगणकीकरणावर भर दिल्यानंतर सर्वच दस्तऐवजांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकºयांसाठी आवश्यक असलेल्या सात-बाराचेही संगणकीकरण करण्यात  आले. शेतकºयांना अद्ययावत सातबारा मिळावा, गट क्रमांकामधील क्षेत्रांसंदर्भात असलेले आक्षेप दूर व्हावे या उद्देशाने सातबारा संगणकीकरण प्रक्रिया राज्यभरात झ्रपाट्याने पूर्ण करण्यात आली; परंतु त्यामध्येही अनेक त्रुटी आढळून आल्यानंतर शासनाने सातबार री-एडिट कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली. या अंतर्गत सुरुवातीला महसूल मंडळ स्तरावर सातबारा चावडी वाचन प्रक्रिया राबवून त्यामध्ये क्षत्र न जुळत असलेल्या गटक्रमांकासह, इतर तांत्रिक अडचणींबाबत शेतकºयांचे आक्षेप नोंदवून घेण्यात आले. ही प्रकिया १५ जुलैपूर्वीच पूर्ण करण्यात आली. त्यानंतर शेतकºयांच्या आक्षेपानुसार आणि लेखी सातबाराचे निरीक्षण करून तहसील स्तरावर दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर जिल्हास्तरावर उर्वरित दुरुस्तीचे काम करून पुन्हा सातबारा री-एडिट प्रक्रिया राबविण्यास सुरूवात करण्यात आली. अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत वाशिम जिल्ह्यातील ८०९ गावांपैकी ७९ गावांचे सर्व्हे दुरुस्तीचे काम पुर्ण करून ५१ गावांचे अंतिम प्रमाणपत्रही पूर्ण झाले आहे. 

Web Title: In the seven-twelve revisions, Washim leads the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.