बालिकेची हत्या करणा-यास सात वर्षांचा कारावास

By admin | Published: December 12, 2014 12:39 AM2014-12-12T00:39:01+5:302014-12-12T00:52:44+5:30

वाशिम जिल्ह्यातील कोंडाळा झामरे येथील घटना.

Seven years imprisonment for the child's murder | बालिकेची हत्या करणा-यास सात वर्षांचा कारावास

बालिकेची हत्या करणा-यास सात वर्षांचा कारावास

Next

वाशिम : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे बेवारस सापडलेल्या तीन वर्षीय निष्पाप बालिकेची भिंतीवर व जमिनीवर आपटून हत्या करणार्‍या लक्ष्मण पांडुरंग शिंदे (रा. कोंडाळा झामरे) या आरोपीस सात वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश वि.रा. सिकची यांनी आज (दि. ११) सुनावली. घटना कोंडाळा झामरे येथे ४ नोव्हेंबर २0१३ रोजी घडली होती.
आरोपी लक्ष्मण शिंदे यास दारुचे व्यसन होते. ४ नोव्हेंबर २0१३ रोजी रात्री ९ ते ९.३0 च्या दरम्यान आरोपी पती लक्ष्मण याने आ पल्यासोबत वाद घालून सोनी नावाच्या तीन वर्षीय बालिकेच्या गालात चापट व बुक्क्यांनी मारहाण करुन भिंतीवर व जमिनीवर तिला आदळले व तिला खांद्यावर उचलून रेल्वेगेटकडे घेऊन गेला व तिचे काहीतरी बरेवाईट करेल, अशी फिर्याद कविता लक्ष्मण शिंदे हिने वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली होती. आरोपी लक्ष्मण हा रेल्वेने अकोलाकडे जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाणेदार आव्हाळे यांनी विनाविलंब अकोला रेल्वे स्टेशनला पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्यासोबत सोनी नव्हती. चौकशी केली असता पंचासमक्ष आरोपीने सोनी हिला जिवाने मारुन तिचे प्रेत मुठाळ यांच्या शेताशेजारी नाल्याच्या काठावर चिखलात गाडून टाकल्याची कबुली दिली. त पासानंतर आरोपीविरुद्ध कलम ३0२, २0१ भादंविनुसार विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश वि.रा. सिकची यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे या प्रकरणात एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अधिकारी लिना यांच्या शवविच्छेदन अहवालानुसार मृतक सोनी हिच्या मृत्यूबाबत निश्‍चित कारण न्यायालयासमोर आले नाही; मात्र आरोपीने मृत्यूबाबत न्यायालयासमोर कसलेही स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे न्यायाधिश यांनी सदरचे पुरावे व परिस्थितीजन्य पुरावे, आरोपीचा कबुली जबाब, तसेच आरोपीचा फरार होण्याचा मानस यावरुन कलम ३0४ भाग २ तसेच कलम २0१ भादंविनुसार आरोपी लक्ष्मण शिंदे यास प्रत्येकी सात वर्षाचा सश्रम कारावास व शंभर रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे सहायक सहकारी अभियोक्ता अँड. अरुण सरनाईक यांनी बाजू मांडली.

Web Title: Seven years imprisonment for the child's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.