विनयभंग व अतिप्रसंगप्रकरणी आरोपीस सात वर्षांचा कारावास
By admin | Published: August 28, 2015 12:11 AM2015-08-28T00:11:21+5:302015-08-28T00:11:21+5:30
मालेगाव येथील घटना.
वाशिम : बालिकेचा विनयभंग व अतिप्रसंग केल्याप्रकरणी दोषी आढळून आलेल्या मालेगाव येथील आरोपी सुरेश प्रभाकर दाभाडे वय ३५ या आरोपीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील जिल्हा न्यायाधिश एक तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश माधुरी ए. आनंद यांनी २७ ऑगस्ट रोजी सुनावली. मालेगाव येथे १५ जानेवारी २0१४ रोजी पिडीत मुलीच्या पित्याने सदर घटनेची फिर्याद दिली होती. आरोपी सुरेश दाभाडे रा. मुंगसाजीनगर मालेगाव याने आपल्या अल्पवयीन मुलीवर विनयभंग करुन अतिप्रसंग केल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरेश दाभाडे याच्यावर कलम ३७६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करुन प्रकरण न्याय प्रविष्ट केले होते. सदर प्रकरणी न्यायालयाने एकूण आठ साक्षीदार त पासले. सरकारी सहाय्यक अभियोक्ता अँड. माधुरी मिसर यांनी सरकारतर्फे युक्तिवाद केला. यामध्ये न्यायालयाने आरोपी सुरेश दाभाडे यास दोषी मानून कलम ३७६ भादंवि अन्वये सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास पुन्हा सहा महिने साधी कैद तसेच बाल लैंगिक अत्याचार कायदा ३ ब, ४ मध्ये सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास पुन्हा एक महिने साधी कैद तर बाल लैंगिक अत्याचार कायदा ३ ब, ८ अन्वये तीन वर्षे सक्त मजुरी व तीनशे रुपये दंड, दंड न भरल्यास पुन्हा १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सदर तिन्ही शिक्षा आरोपीस एकत्रित भोगावयाच्या आहेत.