सेवानिवृत्त योजना कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:39 AM2021-04-17T04:39:55+5:302021-04-17T04:39:55+5:30

केंद्र तसेच राज्य सरकारी कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे. परंतु महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्डातील तसेच ...

Seventh pay applicable to retired scheme employees | सेवानिवृत्त योजना कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू

सेवानिवृत्त योजना कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू

Next

केंद्र तसेच राज्य सरकारी कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे. परंतु महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्डातील तसेच कुटुंब व बालकल्याण योजनेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू न झाल्याने या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत होता. यासंदर्भात वाशिमसह राज्यभरातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी गत चार वर्षांपासून लढा उभारला. वाशिम येथील हुकूमचंद बागरेचा, सुशीला गोटे, वाय.पी. अडागळे, लीला बक्षी, प्रभा पाटील आदी कर्मचा-यांनी शासनदरबारी पाठपुरावा सुरू ठेवला तसेच आमदार अ‍ॅड. किरणराव सरनाईक यांच्यामार्फतही महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना साकडे घातले. आमदार सरनाईक यांनी ना. ठाकूर यांच्याकडे या विषयासंदर्भात पाठपुरावा केला. राज्यभरातूनही सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी समोर आल्याने अखेर महिला व बालविकास विभागाने १५ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्डातील तसेच कुटुंब व बालकल्याण योजनेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला. यामुळे उतारवयात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Seventh pay applicable to retired scheme employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.