अकृषक जमिनींचे सातबारा पुनर्शोधन अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 09:45 PM2017-09-26T21:45:50+5:302017-09-26T21:48:09+5:30
वाशिम: शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या भूमी अभिलेख अद्ययावतीकरण प्रक्रियेमधील अकृषक शेत जमिनींच्या पुनर्शोधनाचे काम वाशिम जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आहे. एकूण ८०९ गावांपैकी ८०३ गावांचे काम पूर्ण झाले असून, येत्या दोन दिवसांत काम पूर्ण होण्याचा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

राज्य शासनाच्यावतीने आॅनलाईन कामकाज पद्धतीवर भर देण्यात येत असून, या अंतर्गत सर्वच कागदपत्रांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत शेत जमिनींच्या सातबारांचे संगणकीकरण करून पुनर्शोधन प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता अकृषक झालेल्या जमिनींच्या सातबारांची पुनर्शोधन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात २६ सप्टेंबर रोजीच्या आकडेवारीनुसार एकूण ८०९ गावांपैकी ८०३ गावांतील अकृषक शेतजमिनींचे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे आता केवळ मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आणि कारंजा तालुक्यातील पाच मिळून केवळ सहा गावांतील पुनर्शोधनाचे काम उरले असून, ही प्रक्रिया येत्या २ दिवसांत पूर्ण करण्याचा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.