शाळांना अनुदान मिळण्यासाठी सेवाग्राम ते नागपूर पदयात्रा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 06:29 PM2018-07-07T18:29:22+5:302018-07-07T18:32:22+5:30

१०० टक्के अनूदान द्यावे, पात्र शाळांना अनूदान सुरु करावे आदी मागण्यांसाठी सेवाग्राम ते नागपूर पदयात्रेला ७ जुलैपासून प्रारंभ झाला .

Sewagram to Nagpur padyatra for schools to get subsidy! | शाळांना अनुदान मिळण्यासाठी सेवाग्राम ते नागपूर पदयात्रा !

शाळांना अनुदान मिळण्यासाठी सेवाग्राम ते नागपूर पदयात्रा !

Next
ठळक मुद्देशिक्षकांना सेवा संरक्षण मिळावे, आदीवासी शाळांना १०० टक्के अनुदान मिळावे, आदी मागण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. . मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानीत शाळा कृती समितीच्या वाशिम येथील पदाधिकाºयांचा सहभाग आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : कायम विनाअनुदानीत तत्वावर परवानगी दिलेल्या व मागील १५-१६ वर्षापासून विनावेतन काम करणाºया राज्यातील हजारो शिक्षक अद्यापही पूर्ण वेतनाच्या प्रतिक्षेत आहेत. १०० टक्के अनूदान द्यावे, पात्र शाळांना अनूदान सुरु करावे आदी मागण्यांसाठी सेवाग्राम ते नागपूर पदयात्रेला ७ जुलैपासून प्रारंभ झाला असून, यामध्ये महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानीत शाळा कृती समितीच्या वाशिम येथील पदाधिकाºयांचा सहभाग आहे.
वेतन नसल्याने शिक्षकांची उपासमार होत आहे. शासनाने काही शाळांना फक्त २० टक्के अनूदान दिले आहे. प्रचलित अनूदान सुत्रानुसार १०० टक्के अनूदान मिळावे, अघोषित शाळांना अनुदानास पात्र म्हणून घोषीत करावे, २० टक्के अनुदानित शिक्षकांना सेवा संरक्षण मिळावे, आदीवासी शाळांना १०० टक्के अनुदान मिळावे, आदी मागण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. ७ जुलैपासून या आंदोलनाला सुरूवात झाली असून, १० जुलै रोजी विधानमंडळावर हा मोर्चा धडकणार आहे. मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, कृती समितीचे पदाधिकारी सहभागी झाले असून, विधान मंडळावरील मोर्चातही सहभागी होणार आहेत, असे विनाअनुदानीत शाळा कृती समितीचे एस.के. वाहुरवाघ, सुरेश सिरसाट, दिपक देशमुख, पुंडलीकराव राहाटे, भैरव भेंडे, उपेंद्र पाटील, विजय देशमुख आदींनी सांगितले.

Web Title: Sewagram to Nagpur padyatra for schools to get subsidy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.