जवळीक साधून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पीडितेस गर्भधारणा, आरोपीवर गुन्हा दाखल
By नंदकिशोर नारे | Updated: May 16, 2024 16:56 IST2024-05-16T16:55:04+5:302024-05-16T16:56:00+5:30
कारंजा तालुक्यातील घटना.

जवळीक साधून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पीडितेस गर्भधारणा, आरोपीवर गुन्हा दाखल
नंदकिशाेर नारे, वाशिम : कारंजा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीसोबत जवळीक साधून तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत तिला दोन महिन्यांची गर्भवती केल्याची घटना कारंजा तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून कारंजा ग्रामीण पोलिसांनी १८ वर्षीय आरोपी युवकावर कलम ३७६ (२), (एन) भांदवि. सहकलम ४, ६ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
कारंजा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील १५ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी व आरोपी युवक एकाच गावात राहतात. हे दोघे एकमेकांशी बोलायचे़. याचा फायदा घेत आरोपीने पीडितेशी जाणीवपूर्वक जवळीक साधली आणि मार्च २०२४ मध्ये तिच्यावर लागोपाठ दोन दिवस लैंगिक अत्याचार केला. या अत्याचारानंतर पीडितेची मासिक पाळी बंद झाली. त्यामुळे ती १३ मे रोजी तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेली होती. तेव्हा ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अशा आशयाच्या पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी युवकावर कलम ३७६ (२), (एन) भांदवि. सहकलम ४,६ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलिस उपनिरीक्षक सुरगडे करीत आहेत.