अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी गर्भवती

By admin | Published: July 4, 2017 02:25 AM2017-07-04T02:25:02+5:302017-07-04T02:25:02+5:30

रिसोड तालुक्यातील घटना : स्त्री रुग्णालयात घटना उघडकीस

Sexual Harassment on Younger Girls; Girl pregnant | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी गर्भवती

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी गर्भवती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : युवकाने अल्पवयीन मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याने मुलीला गर्भधारणा झाल्याची घटना सोमवारी दुपारी जिल्हा स्त्री रुग्णालयात उघडकीस आली. ही घटना रिसोड तालुक्यात २६ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी सोमवारी सायंकाळी आरोपीसह मुलीच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल केला.
सोमवारी दुपारी रिसोड तालुक्यातील एका गावात राहणारी १६ वर्षीय मुलगी गर्भपात करण्यासाठी अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात आली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर गर्भलिंग निदान कायद्यानुसार पाच महिन्यांचा गर्भ काढता येत नसल्याचे मुलगी व तिच्या कुटुंबीयांना सांगितले आणि घटनेची माहिती घेतली. स्त्री रुग्णालयाने मुलीला तक्रार देण्यास रामदासपेठ पोलीस ठाण्यात पाठविले. मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती दहावीत शिकते. तिची मैत्रीण वर्षा लक्ष्मण खांदळे हिच्या ओळखीतील विश्वजित सुखदेव जुमडे (२१) याच्यासोबत तिची भेट झाली. विश्वजित जुमडे हा शाळा परिसरात येऊन पीडित मुलीसोबत बोलू लागला. संपर्क वाढला. २६ फेब्रुवारी २0१७ रोजी मैत्रीण वर्षा खांदळे ही तिच्या घरी आली. माझ्या घरी कोणी नसल्याचे सांगून तिने पीडित मुलीला तिच्या घरी नेले. या ठिकाणी आधीपासूनच विश्वजित जुमडे हजर होता. त्याने घरातील स्वयंपाक खोलीत नेल्यावर वर्षा खांदळे ही घराबाहेर गेली. यावेळी विश्वजित याने बळजबरीने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यातून मुलीला गर्भधारणा झाली. समाजात बदनामी होईल, या भीतीने मुलीने व तिच्या कुटुंबीयांनी ही घटना कोणालाच सांगितली नाही; परंतु मुलीचा गर्भपात करण्यासाठी अकोल्यातील स्त्री रुग्णालयात आल्याने ही घटना उघडकीस आली. मुलीच्या तक्रारीनुसार, रामदासपेठ पोलिसांनी विश्वजित जुमडे, वर्षा खांदळे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ (३४), बाललैंगिक संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Sexual Harassment on Younger Girls; Girl pregnant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.