‘शेडनेट’चे प्रमाण घटले!
By admin | Published: May 21, 2017 01:45 PM2017-05-21T13:45:25+5:302017-05-21T13:45:25+5:30
सन २0११ ते २0१५ या काळात ५५ ठिकाणी ‘शेडनेट’ उभारल्या गेले होते.
Next
वाशिम : कधीकाळी जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये ह्यशेडनेटह्णचे प्रस्थ वाढले होते. मात्र, विपरित हवामानामुळे सद्या ह्यशेडनेटह्ण बहुतांशी हद्दपार झाले आहेत.
सन २0११ ते २0१५ या काळात ५५ ठिकाणी ह्यशेडनेटह्ण उभारल्या गेले होते. त्यात कोथिंबीर, काकडी, ढोबळी मिरची, सिमला मिरची, कारली यासारख्या भाजीपाला पिकांची लागवड करुन समृद्धीकडे वाटचाल सुरु झाली होती. मात्र, अवकाळी पाऊस, वादळी वारा यासह कृषी विभागाच्या उदासिनतेमुळे यातील बहुतांशी ह्यशेडनेटह्ण सद्या नामशेष झाले आहेत.