सावळी पुलाला पहिल्या पावसातच गेले तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 AM2021-06-18T04:28:33+5:302021-06-18T04:28:33+5:30
ग्रामीण भाग नागरी भागांशी जोडले जावे यासाठी मजबूत आणि दर्जेदार बांधकाम साहित्य वापरून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा प्रारंभ काही वर्षांपासून ...
ग्रामीण भाग नागरी भागांशी जोडले जावे यासाठी मजबूत आणि दर्जेदार बांधकाम साहित्य वापरून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा प्रारंभ काही वर्षांपासून तालुक्यांमध्ये सुरू आहे. तालुक्यातील अकोला आर्णी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ ए ला जोडणाऱ्या धावंडा सावळी या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काही महिन्यांपूर्वीच बांधण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत सावळी धावंडा रस्त्यावर सावळीला लागूनच बांधण्यात आलेल्या पुलाची प्रचंड नासधूस हंगामातील पहिल्याच पावसात झाल्याने संपूर्ण धावंडा ते सावळी हा ग्राम सडक योजनेतील मार्ग कसा असेल याबद्दल या रस्त्याने ये-जा करणारे नागरिक व प्रवासी करीत आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पंचाळा चिखलीदरम्यान बांधण्यात आलेल्या सडक योजनेवरील पुलातही नाल्यातील निकृष्ट दर्जाची वाळू वापरण्यात आल्याने या पुलांच्या भवितव्याविषयी प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत तालुक्यातील रस्ते व पुलांची निर्मिती करणाऱ्या कंत्राटदार आणि यावर नियंत्रण असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे मत तालुक्यातील नागरिकांमध्ये चर्चिले जात आहे.
.........................
नुकसानभरपाईची मागणी
मानाेरा : तालुक्यातील खोराडी नदीच्या तीरावर कारखेडा येथे बोराच्या झाडांची फळशेती असलेल्या मयूर देविदास राठोड व गीता देविदास राठोड यांना अनेक वर्षांच्या कष्टातून उभ्या केलेल्या फळबागेला नुकत्याच आलेल्या पुराने मुकावे लागले आहे. झालेल्या नुकसानाची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.
विजय राऊत यांच्या शेतातील ६०ते ७० पोते असलेल्या ज्वारीची कणसे या पुराने भिजलीत. शेकडो बोरींची झाडे वाहून गेली आहेत.
............
प्रहार जनशक्ती पक्ष तालुका पदाधिकारी, कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न
मानोरा : तालुका प्रहार जनशक्ती पक्ष पदाधिकारी कार्यकर्ता आढावा बैठक रविवारी संपन्न झाली. या बैठकीला मानोरा शहर व तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार व पक्ष कार्यध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ यांच्या सूचनेनुसार प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकक्षा रुंदाविण्यासाठी आणि जनतेचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रा. ओमभाऊ बलोदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपजिल्हाप्रमुख वाशिम राम ढाकुलकर, तालुका प्रमुख मानोरा शाम पवार, प्रा. जय चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मानोरा तालुका व शहारतील नवीन पक्ष प्रवेश देणे व पुढील दिवसात मानोरा तालुक्यातील सर्व गावांत प्रहार शाखा उघडण्याचा व पदाधिकारी नियुक्ती करण्यात येण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व मानोरा शहर, उपतालुका प्रमुख मानोरा, पोहरदेवी, मानोरा (शिवाजी नगर), गव्हा, शेंदूरजना सर्कल प्रमुख, गिरोली, कोंडोली, रोहणा, कार्ली, वरोली, एकलारा, सोमठाणा, शेगी, सोयजना, दापुरा, आसोला या सर्कलचे सर्कल प्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते, सर्व प्रहार सेवक आजच्या आढावा बैठकीला उपस्थित होते.
यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून, कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्यात.