अपघाताच्या निषेधार्थ शेलुबाजार बाजारपेठ कडकडीत बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 03:43 PM2018-11-26T15:43:08+5:302018-11-26T15:43:38+5:30

दुर्घटनेचा निषेध आणि वळणमार्गाचा प्रश्न निकाली काढण्यासह अन्य मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी शेलुबाजार येथील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.

Shalubazar market call off a protest against the accident! | अपघाताच्या निषेधार्थ शेलुबाजार बाजारपेठ कडकडीत बंद !

अपघाताच्या निषेधार्थ शेलुबाजार बाजारपेठ कडकडीत बंद !

googlenewsNext

वळणमार्गाचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी : गतिरोधक बसविण्याच्या मुद्यालाही बगल
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलूबाजार (वाशिम) : कारंजाकडून मालेगावकडे जाणाºया भरधाव ट्रकने १३ वर्षीय मुलासह एका बकरीला चिरडल्याची घटना शेलुबाजार येथील जिल्हा परिषद शाळेजवळ रविवार, २५ नोव्हेंबर रोजी घडली होती. या दुर्घटनेचा निषेध आणि वळणमार्गाचा प्रश्न निकाली काढण्यासह अन्य मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी शेलुबाजार येथील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.
अलिकडच्या काळात औरंगाबाद ते नागपूर या द्रुतगती मार्गावरील शेलुबाजारनजीक वाहन अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. संभाव्य वाहन अपघात टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. मात्र, अद्याप त्याची दखल घेण्यात आली नाही. २५ नोव्हेंबर रोजी कारंजाकडून मालेगावकडे जाणाºया ट्रकने शेलुबाजार येथील जिल्हा परिषद शाळेजवळ १३ वर्षीय सतिष संजय टोंचर या मुलासह बकरीला चिरडले. या दुर्घटनेत सतीष टोंचर व बकरी जागीच ठार झाले. 
या दुर्घटनेच्या निषेधार्थ २६ नोव्हेंबर रोजी शेलूबाजार बाजारपेठ बंदची हाक दिली होती. सोमवारी सकाळपासूनच बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्याकरिता शेलूबाजार वळणमार्गाचा प्रश्न निकाली काढावा आणि गावात आवश्यक त्या सर्व ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. मेडिकल आणि दवाखाने या अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद होती. या बंदमध्ये व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी नोंदविला.

Web Title: Shalubazar market call off a protest against the accident!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.