शंभु राजे प्रतिष्ठानच्या युवकांनी वाचविले अपघातग्रस्ताचे प्राण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 04:41 PM2017-12-05T16:41:02+5:302017-12-05T16:43:10+5:30

 मालेगाव : सोमवारच्या मध्यरात्रीला नगर पंचायतजवळील देशपांडे कॉलनीत  पुलाला धडक बसल्याने एका दुचाकीस्वारीचा अपघात झाला. ही घटना माहित पडताच शंभु राजे प्रतिष्ठानचे मयूर भोयर यांनी तातडीने मित्राच्या मदतीने जखमीला ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविले.

Shambhuraje Pratishthan's survivors saved lives of accident victims! | शंभु राजे प्रतिष्ठानच्या युवकांनी वाचविले अपघातग्रस्ताचे प्राण !

शंभु राजे प्रतिष्ठानच्या युवकांनी वाचविले अपघातग्रस्ताचे प्राण !

Next
ठळक मुद्देजखमीला पोहोचविले रुग्णालयात प्रकृती धोक्याबाहेर

 मालेगाव : सोमवारच्या मध्यरात्रीला नगर पंचायतजवळील देशपांडे कॉलनीत  पुलाला धडक बसल्याने एका दुचाकीस्वारीचा अपघात झाला. ही घटना माहित पडताच शंभु राजे प्रतिष्ठानचे मयूर भोयर यांनी तातडीने मित्राच्या मदतीने जखमीला ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविले. वेळीच उपचार सुरू झाल्याने जखमी सध्या धोक्याबाहेर आहे. ज्ञानेश्वर गरड ता.जि. हिंगोली असे जखमीचे नाव आहे.  येथील नगर पंचायतजवळील देशपांडे कॉलनीत मयूर भोयर यांना घराजवळ सोमवारच्या रात्री साधारणत: १२.३० वाजताच्या सुमारास वाहनाचा अपघात झाल्याचा आवाज आला. मयूर यांनी घराबाहेर पडून घटनास्थळ गाठले असता, एक जण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले तर नजीकच्या पुलाखाली एक दुचाकी पडलेली आढळून आली. मयूरने क्षणाचाही विलंब न करताना शेजारी असलेल्या अजय अंभोरे याला बोलावून अपघातग्रस्ताला तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेले. येथे तातडीने डॉक्टर व कर्मचाºयांनी उपचार केल्याने जखमी ज्ञानेश्वर गरड हा शुद्धीवर आला. रात्री हिंगोलीकडे जात असताना, नजरचुकीने पुलाला जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाल्याचे त्याने सांगितले. गरड याच्या डोक्याला मार लागला असून, उपचाराअंती तो मंगळवारी हिंगोलीकडे रवाना झाला. दरम्यान, शंभू राजे प्रतिष्ठानचे सदस्य मयूर भोयर पाटील व अजय अंभोरे यांनी मध्यरात्रीला धावून जात अपघातग्रस्ताचे प्राण वाचविण्यासाठी घेतलेला पुढाकार हा सर्वांच्या कौतुकाचा विषय बनला. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सदैव धाऊन जावे, हा माणुसकीचा संदेश मयूर व अजय यांनी इतरांसमोर ठेवला

Web Title: Shambhuraje Pratishthan's survivors saved lives of accident victims!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.