रिसाेडात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये लावली बेशरमची झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:46 AM2021-07-14T04:46:43+5:302021-07-14T04:46:43+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात निवेदन, उपाेषणही केले हाेते. या रस्त्यावरून रोज सर्वांनाच ये-जा ...
गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात निवेदन, उपाेषणही केले हाेते. या रस्त्यावरून रोज सर्वांनाच ये-जा करावी लागते. त्यामुळे हा रस्ता होणे गरजेचे असल्यामुळे तसेच लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनंत देशमुख यांनी उपोषण सुद्धा केले हाेते. परंतु काही व्यापारी वर्ग तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अखेर समझोता घालून हे उपोषण सोडून घेतले व वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्ही हा रस्ता १५ मार्च रोजी सुरू करतो, असे लेखी आश्वासन देऊन हे उपोषण सोडून घेतले हाेते. परंतु आतापर्यंत या रस्त्याची कुठलीही दुरुस्ती अथवा काम न सुरू होत असल्याचे पाहून अखेर सामाजिक कार्यकर्ते देशमुख यांनी बँड पथकाच्या निनादात रस्त्यावर दुतर्फी महिलांच्या हस्ते बेशरमचे झाडे लावून निषेध नाेंदविला. यावेळी शहरातील महिला तसेच पुरुषांची मोठ्या प्रमाणात देशमुख यांना पाठिंबा देण्यासाठी गर्दी जमली होती.
ठाणेदार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस ताफा हाेता.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसाेड : स्थानिक सिव्हिल लाइन येथील रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनंत देशमुख यांनी अखेर हा रस्ता होत नसल्यामुळे तसेच कोणताही लोकप्रतिनिधी या रस्त्यासाठी पुढाकार घेत नसल्यामुळे १२ जुलै रोजी रिसोड शहरातील महिलांनी या रस्त्यावर बेशरमची झाडे लावून प्रशासनाविषयी निषेध व्यक्त केला.
गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात निवेदन, उपाेषणही केले हाेते. या रस्त्यावरून रोज सर्वांनाच ये-जा करावी लागते .त्यामुळे हा रस्ता होणे गरजेचे असल्यामुळे तसेच लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनंत देशमुख यांनी उपोषण सुद्धा केले हाेते. परंतु काही व्यापारी वर्ग तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अखेर समझोता घालून हे उपोषण सोडून घेतले व वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्ही हा रस्ता १५ मार्च रोजी सुरू करतो, असे लेखी आश्वासन देऊन हे उपोषण सोडून घेतले हाेते. परंतु आतापर्यंत या रस्त्याची कुठलीही दुरुस्ती अथवा काम न सुरू होत असल्याचे पाहून अखेर सामाजिक कार्यकर्ते देशमुख यांनी बँड पथकाच्या निनादात रस्त्यावर दुतर्फी महिलांच्या हस्ते बेशरमचे झाडे लावून निषेध नाेंदविला. यावेळी शहरातील महिला तसेच पुरुषांची मोठ्या प्रमाणात देशमुख यांना पाठिंबा देण्यासाठी गर्दी जमली होती. ठाणेदार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस ताफा हाेता.
.............
खड्ड्यात असलेल्या पाण्यात युवक पाेहले
शहरातील मुख्य रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये बेशरमची झाले लावण्याचे आंदाेलन सुरू असतानाच काही युवकांनी खड्ड्यात जमा झालेल्या पावसाच्या पाण्यात पाेहोण्याचा आंनद घेतला. रस्त्यात माेठमाेठे खड्डे असल्याने व खड्ड्यामध्ये पाणीही असल्याने बेशरमची झाडे लावण्याच्या या आंदाेलनात खड्ड्यातील पाण्यात पाेहोण्याचेही आंदाेलन यावेळी युवकांनी केले. दिवसभर या आंदाेलनाची शहरात चर्चा हाेती. खड्ड्यात असलेल्या पाण्यात युवक पाेहले
शहरातील मुख्य रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये बेशरमची झाले लावण्याचे आंदाेलन सुरू असतानाच काही युवकांनी खड्ड्यात जमा झालेल्या पावसाच्या पाण्यात पाेहोण्याचा आंनद घेतला. रस्त्यात माेठमाेठे खड्डे असल्याने व खड्ड्यामध्ये पाणीही असल्याने बेशरमची झाडे लावण्याच्या या आंदाेलनात खड्ड्यातील पाण्यात पाेहण्याचेही आंदाेलन यावेळी युवकांनी केले. दिवसभर या आंदाेलनाची शहरात चर्चा हाेती.