‘शंकराचार्यांच्या चतु:सूत्रीवर आधारित राष्ट्रनिर्माण व्हावे’
By admin | Published: May 2, 2017 04:47 AM2017-05-02T04:47:38+5:302017-05-02T04:47:38+5:30
आदिशंकराचार्यांनी सत्य, करुणा, सुचिता आणि तप या चतु:सूत्रीचा अवलंब करून सनातन धर्माची स्थापना केली.
वाशिम : आदिशंकराचार्यांनी सत्य, करुणा, सुचिता आणि तप या चतु:सूत्रीचा अवलंब करून सनातन धर्माची स्थापना केली. त्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत देशातील १२५ कोटी जनतेने राष्ट्रनिर्माणात हातभार लावावा, असे अवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे रविवारी केले.
स्थानिक पोलीस कवायत मैदानावर आदिशंकराचार्य यांचा जयंती महोत्सव पार पडला. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. भागवत बोलत होते. ते म्हणाले की, पूर्वीच्या सनातन धर्माचे आधुनिक रूप म्हणजे हिंदू होय. त्यावरूनच देशाचे नाव हिंदुस्थान पडले आहे.
या कार्यक्रमास श्रुतिसागर आश्रम, फुलगांव (पुणे)चे संस्थापक स्वामी स्वरूपानंद सरस्वती, प्रमुख आचार्य माता स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्यासह श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील संत डॉ. रामराव महाराज, अखिल भारतीय त्रिपदी परिवार, इंदौरचे संत बाबा महाराज तराणेकर, वासुदेव आश्रम अभ्यासिका, वाशिमचे विजयकाका पोफळी महाराज यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी भगवत्पूज्यपाद आदिशंकराचार्य पुरस्काराने बडवाह (मध्य प्रदेश) येथील श्रीराम महाराज यांना; तर वेदसंवर्धन पुरस्काराने चैतन्य नारायण काळे (सोलापूर) यांना सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)