मंदिरे उघडण्यासाठी शंखनाद : भाजपच्या वतीने आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:29 AM2021-09-02T05:29:33+5:302021-09-02T05:29:33+5:30
आध्यात्मिक समन्वय आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर भोयर यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदाेलनामध्ये आमदार लखन मलिक, माजी आ. विजयराव जाधव, भाजपचे ...
आध्यात्मिक समन्वय आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर भोयर यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदाेलनामध्ये आमदार लखन मलिक, माजी आ. विजयराव जाधव, भाजपचे नेते राजू पाटील राजे, केशव महाराज वारकरी, सुनील महाराज घायाळ, मदन महाराज उखळे, गजानन महाराज भोयर, रामदास महाराज शिंदे, नंदू महाराज माळेकर, रतन महाराज आढाव, गजानन महाराज शिंदे, माधव महाराज गोटे, बळीराम महाराज कोरडे, केशव महाराज काळबांडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय हेंद्रे, शहराध्यक्ष राहुल तुपसा, डे. सरचिटणीस गणेश खंडाळकर, सुनील तापडिया, उत्तम पोटफोडे, धनंजय रणखांब, नीलेश जैस्वाल, रामभाऊ ठेंगडे, अनंता रंगभाळ, सतीश बकाले, दत्ता होले, गणेश पाठक, संतोष तोंडे, महेश बारटक्के, राजू कलवार, योगेश महाजन, संगीता इंगोले, अंजली पाठक, सोनाली गरजे, छाया मडके, रूपाली देशमुख, इंदिरा बरेटी, भावना सरनाईक, वच्छला जाधव, तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
....
बार, रेस्टाॅरंट, माॅल, रेल्वेगाड्या सुरू केल्यात फक्त मंदिरे बंद ठेवली आहेत, याचा अर्थ असा होतो की, सरकारने फक्त मंदिरातच काेराेना येतो, इतर ठिकाणी येत नाही, असा निष्कर्ष काढला असावा; परंतु भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत.
-लखन मलिक
आमदार, वाशिम-मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघ
राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या निमित्ताने राज्यातील सर्व व्यवसायांना सूट देऊन फक्त सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या देव-देवतांची मंदिरे जाणीवपूर्वक बंद ठेवून षङ्यंत्र आखत आहे.
-विजयराव जाधव
माजी आमदार, मेडशी विधानसभा मतदारसंघ