समृद्धी महामार्गामध्ये शरद पवारांनी घातले लक्ष!
By admin | Published: June 11, 2017 02:10 AM2017-06-11T02:10:16+5:302017-06-11T02:10:16+5:30
शेतकर्यांशी संवाद साधून जाणून घेणार अडचणी; जिल्हय़ातील ५४ गावातून जाणार महामार्ग.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्हय़ातील चार तालुक्यांमधील ५४ गावांना छेदून जात असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी शेतकर्यांचा विरोध पाहता शेतकर्यांनी आंदोलनी छेडलीत; परंतु एकही मोठा नेता यात सहभागी झाला नाही; परंतु शेतकर्यांच्या अडीअडचणी, समस्या सुधारण्याबाबत खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे १२ जून रोजी बैठकीचे आयोजन करून त्या सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
नागपूर-मुंबई मार्गावरील मोठी शहरे ग्रामीण भागाशी जोडण्याकरिता शासनाने ह्यनागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन-वेह्ण अर्थात समृद्धी महामार्ग प्रस्तावित केला आहे. जिल्हय़ातील ९७ किलोमीटर क्षेत्रात ४ तालुक्यांमधील ५४ गावांना छेदून जात असलेल्या या महामार्गासाठी मालेगाव २२, कारंजा लाड २१, मंगरूळपीर १0 आणि रिसोड तालुक्यात एका गावामधील एकूण १५00 हेक्टर जमीन संपादित करणे व याशिवाय कृषी समृद्धी केंद्रांसाठी प्रत्येकी ४00 हेक्टर याप्रमाणे १२00 हेक्टर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हय़ात समृद्धी महामार्गाचे अंतर ९७ किलोमीटर असून, ९३ किलोमीटर अंतराचे ह्यड्रोनह्णद्वारे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. दगड रोवणीचे (पिलर फिक्सिंग) ७५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, ३५ गावांमध्ये संपादित करावयाच्या जमिनीची संयुक्त मोजणी केली आहे. मोजणी करीत असताना गावांमधील काही शेतकर्यांनी नियोजित स्थळी हजेरी लावली; मात्र ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेल्या १00 पेक्षा अधिक पोलीस बंदोबस्तामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. शेतकर्यांचा विरोध या समृध्दी महामार्गाला का आहे, शासनाच्यावतीने त्यांच्या प्रश्नांचे निरसन व्यवस्थित केल्या जात आहे नाही, यासह या महामार्गात निर्माण होणार्या अडचणी, समस्या, सुधारणेबाबत खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे १२ जून रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद येथील संत तुकाराम सभागृहामध्ये (सिडको नाटयगृह) १२ जून रोजी दुपारी २ वाजता ही बैठक सुरू होणार आहे. या बैठकीमध्ये महामार्गातील अडचणी, कोण्या शेतकर्यांच्या काही सूचना यासह समृद्धी महामार्गाबाबत सर्व प्रश्नांबाबत चर्चा व संवाद साधल्या जाणार आहे. यामध्ये शेतकर्यांच्या प्रत्येक प्रश्नांचे निरासरण केल्या जाणर आहे. जिल्हय़ातील शेतकर्यांनी या बैठकीस उपस्थित राहून आपल्या शंकांचे निराकरण करण्याचे आवाहन अँड. नजिर काझी यांनी केले आहे.