मालेगावातील शौर्य शंभूच्या शिलेदारांच्या कार्याची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 02:47 PM2018-05-04T14:47:32+5:302018-05-04T14:47:32+5:30
मालेगाव : विदर्भातील दुर्लक्षीत असलेल्या गाविलगड येथील किल्ल्यासह इतर गडकिल्ल्यांना गतवैभव प्राप्त करुण देण्यासाठी मालेगाव येथील शौर्य शंभू संघटनेने पुढाकार घेतला आहे.
मालेगाव : विदर्भातील दुर्लक्षीत असलेल्या गाविलगड येथील किल्ल्यासह इतर गडकिल्ल्यांना गतवैभव प्राप्त करुण देण्यासाठी मालेगाव येथील शौर्य शंभू संघटनेने पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत त्यांनी राज्यातील किल्याची स्वछता मोहीम हाथी घेतली आहे. याची दखल पुरातत्व विभागाने घेतली असून, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी कळविले असल्याची माहिती या मोहिमेचे प्रमुख प्रा. प्रकाश कापुरे यांनी दिली आहे.
गाविलगड हा विदर्भातील अतिशय दुर्लक्षित किल्ला असून, या किल्ल्याची माहिती शासनाकडे देण्याचे महत्वाचे काम शौय शंभूच्या शिलेदारांनी केले आहे. गडकिल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून देण्याच्या मोहिमेंतर्गत त्यांनी सर्वप्रथम गाविलगडच्या किल्ल्याची पाहणी केली. यासाठी मोहिम आखून तेथे स्वच्छता केली, तसेच दुर्लक्षीत भागाची माहिती शोधून काढत. पुरातत्त्व विभाग आणि शासनाकडे या संदर्भात पत्र व्यवहार केला. त्याची दखल पुरातत्त्व विभागाने घेतली आणि शौर्य शंभूच्या कार्यात सक्रिय सहभागही नोंदविला, तसेच पुढे या मोहिमेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. या मोहिमेत रखरखत्या उन्हात गडावर जमलेला घाणकचरा साफ करण्यात आला. यादरम्यान शौर्यशंभूचे शिलेदार आणि पुरातत्त्व विभागाने किल्ल्यावरील विविध भागांच्या छायाचित्रांची प्रदर्शनी भरविली. या प्रदर्शनीला लाभ परिसरातील नागरिक आणि पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ही बाब केंद्र आणि राज्य सरकार च्या निदर्शनास आणून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या गाविलगड किल्ल्यासाठी आणखी काय करता येईल. त्याची योजना आखण्याचे ठरले. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. प्रकाश कापुरे, प्रा. रवि बाविस्कर, प्रा. संतोष उगले, अनिल सोळंके, निखिल गोरे, किरण जिरवणकर, शिवाजी नायक, बाळासाहेब पारडे, यश इंगोले यांच्या केंद्रीय पुरातत्त्व विभाग नागपूरचे उपअधिक्षक इजहार हाश्मी, मिलिंद विष्णूपंत अंगाईतकर, पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शन शिल्पा जमगडे यांची चमू उपस्थिती होती. येत्या आॅगष्ट महिन्यात पुन्हा शौर्य शंभूची मोहिम आखण्यात येणार असल्याचे प्रा. रवि बाविस्कर यांनी सांगितले.