शेलु तडसे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दोन वर्षांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 02:43 PM2018-05-05T14:43:46+5:302018-05-05T14:43:46+5:30
वाशिम : तालुक्यात येणाऱ्या शेलु तडसे येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची ईमारत मागील दोन वर्षांपासून नव्याने तयार असून कर्मचाऱ्याअभावी मात्र ही ईमारत शोभेची वास्तू बनलेली आहे. कर्मचारीच नसल्याने हे उपकेंद्र दोन वर्षांपासून बंद आहे.
वाशिम : तालुक्यात येणाऱ्या शेलु तडसे येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची ईमारत मागील दोन वर्षांपासून नव्याने तयार असून कर्मचाऱ्याअभावी मात्र ही ईमारत शोभेची वास्तू बनलेली आहे. कर्मचारीच नसल्याने हे उपकेंद्र दोन वर्षांपासून बंद आहे. तसेच सदर उपकेंद्राची इमारत उच्च दाब विद्युत वाहिनी खाली तयार केल्यामुळे सदर ईमारतीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याकडे मात्र आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
शेलु तडसे येथे १५०० ते २००० लोकसंख्या आहे. येथे नेहमी साथीचे रोग बळावतात त्यामुळे यावर नियंत्रण आणण्यासाठी तसेच जवळपासच्या गावाला आरोग्य सुविधा तातडीने जागीच मिहावी याकरिता जिल्हा परिषद सदस्य नथ्थुजी कापसे यांनी पुढाकार घेवून सदर आरोग्य उपकेंद्रमंजुर करुन घेतले होते. या उपकेंद्रासाठी एक कोटी रुपयांचा निधी खर्ची घालून दोन वर्षापूवी ईमारत बांधण्यात आली. परंतु संबधित बांधकाम यंत्रणेच्या ले-आऊट देणाºया इंजिनियर तथा संबंधित ठेकेदाराच्या अक्षम्य चुकीमुळे , हलगर्जीपणामुळे सदर इमारत ही विद्युत कंपनीच्या उच्च दाब वाहिनी खाली उभ्ज्ञारण्यात आल्याने सदर ईमारत सदैव धोक्यात आली आहे. येथे विद्युत अपघात होवून जिवित्वास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर इमारतीमध्ये विद्युत पुरवठा अद्याप घेतला नसून या ईमारतीमध्ये कामकाज सुरु होण्यापूर्वी खिडक्या, दाराच्या काचा फुटल्या असून ईमारतीची दयनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे निष्पन्न होते. सदर उपकेंद्राकरीता तरतूद असतांना ईनव्हरटर लावलेले नाही.तसेच या आरोग्य उपकेंद्राकरीता एक आरोग्य सेवक, दोन आरोग्यसेविका, एक शिपाई असे पदभरती पाहिजे, परंतु ही पदभरती न केल्यामुळे हे आरोग्य उपकेंद्र बंद आहे. याकरिता पदभरती करावी असा प्रस्ताव वारला प्रा.आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शामला सुडे यांनी शासनाकडे पाठविला आहे. तसेच पदभरती करुन शेलु आरोग्य उपकेंद्र तात्काळ सुरु करावे अशी मागणी निवेदनाव्दारे शेलुच्या सरपंच तृष्णा देवानंद गुळे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे. तसेच सदर उपकेंद्र लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केल्या जात आहे.
आपण वार्ला प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत येणाऱ्यां शेलु (तडसे) प्राथमिक आरोग्य उपकेंद्राकरिता कर्मचाºयांची मागणी दोन तीन वेळा वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करुन केली आहे. तसेच तात्पुरते कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे.
- शामला सुडे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, वार्ला.