शेलूबाजारची बाजारपेठ कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:37 AM2021-03-22T04:37:39+5:302021-03-22T04:37:39+5:30
शेलूबाजार येथे वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी प्रकाश मुळे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात १८ मार्च रोजी बैठक ...
शेलूबाजार येथे वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी प्रकाश मुळे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात १८ मार्च रोजी बैठक घेतली. शेलूबाजार येथे व्यापारी व कामगारांच्या केलेल्या चाचणीत ४८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यामुळे पुढील धोका टाळण्यासाठी व ग्रामीण भागात परिणाम होऊ नये म्हणून बाजारपेठ २० मार्च ते २४ मार्चपर्यंत ५ दिवसांसाठी अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन करण्याचे आदेश त्यांनी निर्गमित केले. या आदेशानुसार शेलूबाजार गावातील अंतर्गत सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून पोलिसांनी बंद केले आहे. परिसरात जनतेला फिरण्यास बंदी आहे. केवळ नागपूर-औरंगाबाद आणि अकोला-मंगरुळपीर मार्गावरील वाहतूक सुरू आहे; परंतु या मार्गावर कोणतेही वाहन थांबविण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे कठोर पालन केले जात असून, बाजारपेठ कडकडीत बंद, तर गावात शुकशुकाट दिसत आहे.