शेलूबाजार सरपंचपद सर्वसाधारणसाठी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:21 AM2021-02-05T09:21:04+5:302021-02-05T09:21:04+5:30
तालुक्यात मोठी बाजारपेठ व राजकीय केंद्रबिंदू असलेल्या शेलूबाजार सरपंचपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ७ डिसेंबर रोजी आरक्षणाची सोडत ...
तालुक्यात मोठी बाजारपेठ व राजकीय केंद्रबिंदू असलेल्या शेलूबाजार सरपंचपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ७ डिसेंबर रोजी आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती. त्यावेळीही सरपंचपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण निघाले होते त्यामुळे या आरक्षणातही कुठलाही बदल झाला नाही. ४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होत असलेल्या महिला आरक्षणानंतर महिला किंवा पुरुष याबाबत चित्र स्पष्ट होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत एकता ग्रामविकास पॅनलचे १३ पैकी ७ सदस्य निवडून आल्याने सरपंचपदी कोण विराजमान होऊन गावाचा कारभारी होतो याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शेलूबाजारसह नजीकच्या गावातील ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण यावेळी काढण्यात आले. यामध्ये सर्वसाधारण जागेसाठी शेंदूरजना मोरे, हिरंगी, चोरद, पिंप्री अवगण, माळशेलू ,वनोजा , तऱ्हाळा,चिखली,पिप्री खु, भूर .एस.सी. प्रवर्गासाठी येडशी, मसोला बु., एस.टी. प्रवर्गासाठी पेडगाव, नामाप्र प्रवर्गासाठी ईचा, कंझरा, पार्डी ताड, नांंदखेडा, लाठी, तपोवन असे आरक्षण काढण्यात आले.