शेंडीने गाडे ओढण्याची परंपरा कायम!

By admin | Published: April 9, 2017 08:11 PM2017-04-09T20:11:50+5:302017-04-09T20:11:50+5:30

वाशिम- जिल्ह्यातील ग्राम ईचा नागी येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवपार्वती संस्थानवर भाविकांकडून शेंडीने गाडे ओढण्याची परंपरा यंदाही कायम असल्याचे दिसून आले.

Shendi has the tradition of pulling the carriage! | शेंडीने गाडे ओढण्याची परंपरा कायम!

शेंडीने गाडे ओढण्याची परंपरा कायम!

Next

वाशिम : जिल्ह्यातील शेलुबाजार (ता. मंगरूळपीर) येथून जवळच असलेल्या ग्राम ईचा नागी येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवपार्वती संस्थानवर आयोजित धार्मिक महोत्सवाची रविवारी सांगता झाली. यानिमित्त भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तद्वतच भाविकांकडून शेंडीने गाडे ओढण्याची परंपरा यंदाही कायम असल्याचे दिसून आले.
एकामागे एक असंख्य बैलगाड्या लावून आणि त्यावर मोठ्या संख्येत नागरिकांना बसवून एक व्यक्ती शेंडीने गाडे ओढून नवस फेडतो. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा शिवपार्वती संस्थानवर भाविकांकडून यंदाही कायम ठेवण्यात आली. मनात आणलेली इच्छा पूर्ण झाल्यानंतर भाविकांकडून हा प्रकार केला जात असल्याचे काही भाविकांनी सांगितले. 

Web Title: Shendi has the tradition of pulling the carriage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.