शिरपूर येथील उपबाजाराची साडेसाती कायम !

By admin | Published: May 30, 2014 01:12 AM2014-05-30T01:12:35+5:302014-05-30T01:14:26+5:30

शिरपूर उपबाजार समिती केंद्र असुविधांनी ग्रासले आहे.

Shibpur subdistrict bank | शिरपूर येथील उपबाजाराची साडेसाती कायम !

शिरपूर येथील उपबाजाराची साडेसाती कायम !

Next

शिरपूर : मालेगाव कृषी बाजार समिती अंतर्गत येणारे शिरपूर उपबाजार समिती केंद्र अपुरे टिनशेड, कुंपणाचा अभाव, कार्यालयाच्या इमारतीचा तुटलेले दरवाजा व खिडक्या यासारख्या समस्यांनी पूर्णत: ग्रासले आहे. या उपबाजारातील सुविधा लवकरच पूर्ववत सुरू होतील, या आश्‍वासनापलीकडे शेतकर्‍यांना काहीच मिळत नसून, उपबाजाराची साडेसाती कायमच दिसून येत आहे. शिरपूर उपबाजारअंतर्गत २५ ते ३0 गावे असून, येथील उपबाजार केंद्र परिसरातील शेतकरी मोठय़ा प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आणत असतात हंगामामध्ये दररोज २ हजारावर क्विंटलच्यावर शेतमाल विक्रीसाठी उपबाजारात येत असतो. यापासून बाजारसमितीला वर्षाकाठी ४0 ते ५0 लाखांचे उत्पन्न मिळते. हा शेतमाल ठेवण्यासाठी असलेले टिन शेड अत्यंत तोकडे असल्याने शेतकर्‍यांना त्यांचा माल उघडयावर ठेवावा लागतो त्यामुळे बर्‍याच वेळा अचानक आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचा माल भिजून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता तर उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे शेतमाल विक्रीसाठी आणणार्‍या शेतकर्‍यांना उन्हात ताटकळत उभे रहावे लागते. याचा त्रास व्यापार्‍यांनासुद्धा होत आहे. त्यातच कार्यालयाची इमारतही अतिशय लहान असून, इमारतीचे दरवाजे व खिडक्यांना मोठमोठी भगदाडे पडली आहेत. भरीसभर म्हणजे इमारतीला आवारभिंत अथवा तारेचे कुंपण नसल्याने लहान-सहान चोर्‍या होऊन त्यात व्यापार्‍यांचे नुकसान झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे उपबाजार केंद्रामध्ये मोठे टिनशेड ओटा बांधणे इमारतीची दुरुस्ती करणे व परिसराला कुंपण घालणे गरजेचे झाले आहे; मात्र याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन बाजार समितीमधील समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.

Web Title: Shibpur subdistrict bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.