जलसंधारणाच्या कामांत चिमुकल्यांचे श्रमदान 

By admin | Published: April 29, 2017 02:52 PM2017-04-29T14:52:54+5:302017-04-29T14:52:54+5:30

गावकरी मोठया उत्साहाने सकाळी व रात्री श्रमदान करून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न करीत असताना बालकांनीही यात सहभाग नोंदविण्यास सुरूवात केली आहे. 

Shimadan of Chinmukanya in water works | जलसंधारणाच्या कामांत चिमुकल्यांचे श्रमदान 

जलसंधारणाच्या कामांत चिमुकल्यांचे श्रमदान 

Next

कारंजा लाड: पाणी फांउडेशन कडून सत्यमेव जयते वॉटर स्पर्धेमध्ये कारंजा तालुक्याची निवड करण्यात आली असून या स्पर्धेदरम्यान गावकरी मोठया उत्साहाने सकाळी व रात्री श्रमदान करून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न करीत असताना बालकांनीही यात सहभाग नोंदविण्यास सुरूवात केली आहे. 
 वेगवेगळया समाजिक, राजकीय संघटना पुढे येऊन जलसंधारणाच्या कामासाठी श्रमदान करीत आहे. गाव पाणी दार करण्यासाठी आपली मदत व्हावी या हेतूने ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष राजेश हवा, विस्तार अधिकारी रवीद्र दहापुते, विनोद श्रीराव, ग्रामसेवक विनोद मोरे, डि.जी.निघोट, रामेश्वर सफकाळ, गजभिये तसेच पाणी फांउडेशने प्रशिक्षक दिलीप देवतळे, सुरज देशमुख यांच्या सह जयपूर येथील सरपंच ग्रामपचायत सदस्य व गावकरी श्रमदान २९ एप्रिल रोजी श्रमदान करीत होते. यावेळी गावातील लहान लहान बालकांंनीही आपली चमू तयार करून वानरसेनेप्रमाणे एलबीएसच्या कामांसाठी श्रमदान करुन मोठा हातभार लावला.  बालगोपाल जलसंधारणाच्या कामात सहकार्य करीत असल्याचे पाहून वडिलधारी मंडळी भारावली. बालगोपालांमुळे त्यांचाही उत्साह द्विगुणित झाला.  या सर्वाच्या मदतीने एकुण २९ एप्रिल रोजी सकाळी ७ ते ९ या दोन तासच्या वेळात तिन एल.बी.एस. म्हणजेच दगडी बांध तयार करण्यात आले. या बांधामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह कमी होऊन शेतामधील सुपिक माती वाहुन जाणार नाही. पाण्याची साठवण श्रमता वाढून पाणी जमिनित मुरणार आहे. हा दगडी बांध नाल्यावर पावसाळयात उपयुक्त ठरतो. 

Web Title: Shimadan of Chinmukanya in water works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.