एसटीचा श्रावणात शिमगा; कर्मचाऱ्यांचा पगार लटकला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:47 AM2021-08-17T04:47:17+5:302021-08-17T04:47:17+5:30
दर महिन्याच्या ७ तारखेला पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होत असतो; मात्र ऑगस्ट महिन्याची १४ तारीख उलटली असतानाही एसटी कर्मचाऱ्यांचा ...
दर महिन्याच्या ७ तारखेला पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होत असतो; मात्र ऑगस्ट महिन्याची १४ तारीख उलटली असतानाही एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे ‘महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना’ ही मान्यताप्राप्त एसटी कर्मचारी संघटना औद्योगिक न्यायालयात दावा ठोकण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. कोरोना काळात सुरुवातीला एसटी सेवा सर्वसामान्य लोकांकरिता पूर्णपणे बंद होती, त्यामुळे एसटीला मोठा फटका बसला होता. इंधनाचे वाढते दर, कर्मचाऱ्यांबरोबर झालेले वेतनकरार, कमी होणारी प्रवासी संख्या यामुळे एसटी महामंडळाचे पेकाट पार मोडले आहे. त्यातच अनेक प्रकारच्या अनुदानांचा परतावा सरकारकडून थकला आहे. या सर्व परिस्थितीमुळे एसटी महामंडळावर कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे.
--------
१) आकडे काय सांगतात?
आगार - कर्मचारी
वाशिम - २६७
मंगरुळ - २३८
कारंजा - २३०
रिसोड - २५७
--------------
२) उत्पन्न कमी अन् खर्च जास्त
जिल्ह्यात वाशिम, रिसोड, कारंजा आणि मंगरुळपीर हे चार आगार आहेत. चारही आगारात मिळून १८६ च्या आसपास बसगाड्या आणि एक हजारांच्या जवळपास कर्मचारी आहेत. साधारणत: प्रत्येक आगाराला सद्यस्थितीत दरदिवशी अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. तथापि, खर्चाचे प्रमाण त्यापेक्षा अधिक आहे. एखादे आगार सोडले तरी डिझेल, टायर, फिल्टर, ऑईलवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. साधारणत: दरदिवशी ३ लाखांहून अधिक खर्च येतो. त्यामुळे वेतनासाठी रक्कम शिल्लक ठेवणेच कठीण होत आहे.
-----------------------
३) उसनवारी तरी किती करायची?
१) कोट: कोरोना संसर्गाच्या काळात आधीच अडचणीत वाढ झाली आहे. त्यात एसटी महामंडळाकडून जुलै महिन्याचा पगार अद्यापही मिळाला नाही. त्यामुळे घरचा खर्च कसा चालवायचा, देणीघेणी कशी करायची, मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा, असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
- गोपाल झळके,
एसटी कर्मचारी
---------
कोट - एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होत असतो. त्यानुसारच आमच्या खर्चाचे नियोजनही असते; परंतु आता १४ ऑगस्ट उलटली तरी आमच्या पगाराचा काही पत्ता नाही. मागील महिन्यात झालेल्या खर्चाची देणीघेणी, या महिन्याचे नियोजन कसे करायचे, घराचा खर्च कसा चालवायचा, असे प्रश्न आहेत.
-विजय सावळे,
एसटी कर्मचारी,
--------------
४) नियंत्रकाचा कोट
कोट: गेल्यावर्षी दोन महिने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झाला नव्हता, राज्य सरकारने एक हजार कोटींची तत्काळ मदत केल्याने ते प्रकरण मार्गी लागले होते. तेव्हा सध्याच्या परिस्थितीत सरलेल्या कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याचा पगार कसा द्यायचा असा प्रश्न एसटी महामंडळापुढे आहे. ९० हजारांपेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांचा पगार अजून झालेला नाही.
-मुकुंद न्हावकर,
आगार व्यवस्थापक, कारंजा.
-----------------------