स्वच्छतेसाठी वाशिममधील शिरपूर ग्रामपंचायतीचा पुढाकार
By admin | Published: June 29, 2017 02:18 PM2017-06-29T14:18:52+5:302017-06-29T14:18:52+5:30
स्थानिक ग्रामपंचायतने गावात स्वच्छता निर्माण राहावी म्हणून गावक-यांना 150 कचराकुंडी वाटप करुन नव्या घंटागाडी सुरू केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
शिरपूर जैन (वाशिम), दि. 29 - स्थानिक ग्रामपंचायतने गावात स्वच्छता निर्माण राहावी म्हणून गावक-यांना 150 कचराकुंडी वाटप करुन नव्या घंटागाडी सुरू केली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. शिरपूर गाव दिवसेंदिवस मोठे होत असताना गावात मात्र जिकडे तिकडे अस्वच्छता पसरल्याचे चित्र होते. ग्रामपंचायतने स्वच्छतेबाबत वेळोवेळी प्रयत्नही केले, परंतु ते पाहिजे तसे यशस्वी होऊ शकले नाही. त्यामुळे गावातील घाण नष्ट करण्यासाठी ग्रामपंचायतने एक नवीन घंटागाडी विकत घेण्याचा निर्णय घेतला. या घंटागाडीची सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपसरपंच असलम गवळी, मो.ईमदाद बागवान, बाळासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसे जिल्हाध्यक्ष अशोक अंभोरे यांच्या हस्ते २९ जूनपासून गावात घंटागाडी सुरू करण्यात आली. यावेळी ग्राम पंचायतच्यावतीने बसस्थानक परिसरातील दुकानदारांनी दुकानातील केरकचरा रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये म्हणून त्यांना व गावातील १५० दुकानदारांना नवीन कचरा कुंड्यांचे मोफत वाटप केले.
लाईट मोठ्या प्रमाणात लावून गाव प्रकाशमय केले आहे. आता गाव स्वच्छतेसाठी स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेतला असल्याचे सांगितले. तसेच यापुढे सार्वजनिक ठिकाणी केरकचरा टाकणा-यावर ग्रामपंचायतने कारवाई करावी अशा सूचना दिल्या.
या कार्यक्रमाला वसंता देशमुख, संतोष भालेराव, संजय भालेराव, संजय गौर, गजानन वानखेडे, विजय अंभोरे, गणेश अंभोरे, कैलास राऊत, रामा गडदे, बंशी इंगळे, कैलासआप्पा देवकर, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
मांगुळ झनकनंतर शिरपूरचा स्वच्छतेसाठी पुढाकार
गत तीन ते चार वर्षापूर्वी आमदार अमित झनक यांचे गाव असलेले मांगुळ झनक येथील सरपंचा माधवी दत्तराव झनक यांनी गावात घंटागाडी व प्रत्येक घरासमोर कचराकुंडीचा उपक्रम राबवण्यात आला होता. तो अविरत सुरु असल्याने गावात स्वच्छता नांदत आहे. त्या पाठोपाठ शिरपूर ग्रामपंचायतने घेतलला पुढाकाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. गाव स्वच्छ राहिल्यास रोगराई दूर राहते या गोष्टीला लक्षात घेवून हा उपक्रम शिरपूर ग्रामपंचायतने घेतला. याला नागरिकांनही उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.