शिरपूर, मालेगाव, रिसोड, जऊळका पोलीस स्टेशनचे दूरध्वनी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:47 AM2021-09-23T04:47:21+5:302021-09-23T04:47:21+5:30

मागील कित्येक दिवसांपासून विविध ठिकाणचे दूरध्वनी बंद पडले आहेत. त्यामुळे सरकारी कार्यालयाशी संपर्क करायचा असल्यास अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या ...

Shirpur, Malegaon, Risod, Jaulka police station telephones are off | शिरपूर, मालेगाव, रिसोड, जऊळका पोलीस स्टेशनचे दूरध्वनी बंद

शिरपूर, मालेगाव, रिसोड, जऊळका पोलीस स्टेशनचे दूरध्वनी बंद

Next

मागील कित्येक दिवसांपासून विविध ठिकाणचे दूरध्वनी बंद पडले आहेत. त्यामुळे सरकारी कार्यालयाशी संपर्क करायचा असल्यास अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर संपर्क करावा लागतो. मात्र, वैयक्तिक नंबर उपलब्ध असतीलच असे नाही. त्यातच अतिमहत्त्वाच्या असलेल्या शिरपूर, मालेगाव, रिसोड, जऊळका या पोलीस स्टेशनची दूरध्वनी सेवा मागील कित्येक महिन्यांपासून बंद आहे.

सध्याच्या परिस्थितीत शिरपूर पोलीस स्टेशनअंतर्गत चोरी व जबरी चोरी (दरोडा) मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एक हत्या व जऊळका पोलीस स्टेशनअंतर्गत चाकातीर्थ येथे एका दाम्पत्याची हत्या, अशा मोठ्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांची माहिती पोलिसांना देण्यासाठीसुद्धा दूरध्वनी बंद असल्याने अडचण निर्माण होते. पोलीस स्टेशनचे दूरध्वनी सुरू होण्याची शक्यता कमी असल्यास अंमलदार किंवा स्टेशन डायरीच्या ठिकाणी एक स्वतंत्र मोबाईल ठेवण्यात यावा. तो मोबाईल क्रमांक सार्वजनिक करण्यात यावा. जेणेकरून कुठलीही अनुचित घटना घडल्यास नागरिकांना पोलीस स्टेशनशी तत्काळ संपर्क करता येईल. सर्वच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांजवळ मोबाईल असले तरी त्यांचे नंबर सामान्य नागरिकांकडे उपलब्ध नसतात. त्यामुळे पोलीस स्टेशनचे दूरध्वनी सुरू करणे अथवा ठाणे अंमलदार स्टेशन डायरीवर स्वतंत्र मोबाईल नंबर उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे.

-----

बंद दूरध्वनीबाबत शिरपूर येथील भारत संचार निगम लिमिटेडच्या कार्यालयात वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत. मात्र, याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत आहे.

- कृष्णा नागरे,

कर्मचारी, पोलीस स्टेशन, शिरपूर

Web Title: Shirpur, Malegaon, Risod, Jaulka police station telephones are off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.