शिरपुरात उमेदवारांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:12 AM2021-01-08T06:12:09+5:302021-01-08T06:12:09+5:30
१० दिवसांवर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारण्यासाठी सर्वच गावपुढाऱ्यांनी कंबर कसली आहे. ६ वॉर्डांमध्ये १७ सदस्य निवडीसाठी होत ...
१० दिवसांवर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारण्यासाठी सर्वच गावपुढाऱ्यांनी कंबर कसली आहे. ६ वॉर्डांमध्ये १७ सदस्य निवडीसाठी होत असलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी वॉर्ड क्रमांक एकमधील ३ जागांवर ५ महिला व ४ पुरुष, दोनमध्ये ६ महिला व ३ पुरुष, तीनमध्ये २ जागांसाठी २ महिला २ पुरुष, चारमध्ये ३ जागांसाठी २ महिला, ४ पुरुष, पाचमध्ये ३ जागांसाठी ४ महिला २ पुरुष; तर वॉर्ड क्रमांक ६ मध्ये ३ जागांकरिता ६ महिला आणि २ पुरुष आमनेसामने उभे ठाकले आहेत.
शिरपूर ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा १२ हजार ६४५ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये पुरूष मतदार संख्या ६ हजार ७४४ आणि महिला मतदारांची संख्या ५ हजार ९०१ इतकी आहे. महिलांसाठी १७ पैकी ९ जागा आरक्षित आहेत. असे असले तरी काही सर्वसाधारण ठिकाणी महिला उमेदवार उभ्या असल्याने महिला उमेदवारांची संख्या वाढली आहे. २०१५ च्या निवडणुकीतही महिलांसाठी ९ जागा आरक्षित होत्या. त्यावेळी देखील महिला उमेदवारांची संख्या अधिक होती. १ महिला सर्वसाधारण गटातून निवडून आल्याने महिला एकूण सदस्यांची संख्या १० झाली होती, हे विशेष.